मीरा-भाईंदर मराठी मोर्चापूर्वी पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलं, सुटकेसाठी प्रकाश महाजन
Mira Bhayandar MNS Morcha : अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा (Mira Bhayandar MNS Morcha) काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी (Police) या मोर्चाला परवानगी नाकारली असून, प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत, पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलले. सकाळी साडेतीन वाजता, मोठ्या पोलीस फौजफाट्यासह त्यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. यापूर्वीच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, अविनाश जाधव मोर्चात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांनी मराठी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले होते. सध्या अविनाश जाधव यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) चांगलेच आक्रमक झाले आहे.
अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) आणि वैभव खेडेकर हे खेड तहसीलच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला बसणार आहेत. अविनाश जाधव यांना पोलिसांनी तातडीने सोडावे, या मागणीसाठी दोन्ही नेते धरणे आंदोलन करणार आहेत. याबाबत बोलताना प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे की, आज पहाटे साडेतीन वाजता आमच्या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली. शासनाच्या या दडपशाही विरुद्ध आज मी खेड येथे आमच्या पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या सोबत तहसील कार्यालया समोर निदर्शन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मनसेचे अनेक पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, आज मीरा रोड येथे होत असलेल्या मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांना पहाटे तीन वाजता घरातून उचलून विविध पोलीस ठाण्यात बसवण्यात आले आहे. नालासोपारा पोलीस ठाणे, विरार पोलीस ठाणे, नायगांव पोलीस ठाणे, वालीव पोलीस ठाणे आदी ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि शहर सचीव प्रफुल्ल पाटील, वसई शहर संघटक राकेश वैती, शहर अध्यक्ष प्रवीण भोईर, विरार शहराध्यक्ष विनोद मोरे, नालासोपारा उपशहराध्यक्ष संजय मेहरा, नालासोपारा विभागध्यक्ष दिलीप नेवाळे, कल्पेश रायकर, वाहतूक सेना अध्यक्ष पांडुरंग लोखंडे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=gm0dnkbkrag
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.