पडळकरांचं समर्थन नाही, पण तेच एकटे दिसतात का? दुसऱ्यांचे आका कोण ते ही शोधा : देवेंद फडणवीस

मुंबई : विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्ताववरील चर्चेत शेवटचा दिवस गाजला तो, आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन. विधानसभा अध्यक्षांनी आज दोन्ही आमदारांच्या दोन्ही समर्थकांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले आहेत. तर, याप्रकरणी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फड्नाविस) हेही संतापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेवर राजकारणापलिकडे जाऊन सर्वच नेत्यांनी भूमिका घ्यायली हवी, हे सगळे आमदार माजले आहेत, अशी भावना बाहेर लोकांची असल्याचं फडणवीसांनी बोलून दाखवलं. दरम्यान, झाल्या प्रकाराबद्दल दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त केला. याबाबत बोलताना

एखादे आमदार शिव्या देऊन चालतात, मग त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का, ज्यामुळे ते एवढी हिंमत करतात? असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मुख्यमंत्र्‍यांनी बाकीच्यांचे आका कोण आहेत, हेदेखील शोधलं पाहिजे, असे म्हटलं. ”कालची घटना घडली त्यात दोन्ही नेते जसे वागत होते, हे नक्षल आहे अमुक आहे तमुक आहे, ते मंगळसूत्र चोर वगैरे. लहान मुलंदेखील असे भांडत नाही होss यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री

पत्रकाराच्या एका प्रश्नावर उत्तर देताना, गोपीचंद पडळकर  अजित दादांविरोधात बोलले, मी समज दिली होती. पवार साहेबांबद्दल बोलले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, तुम्हाला पडळकरच का दिसतात, अर्थात दुसऱ्याला चुकीचं ठरवताना कुणी यांचं समर्थन करत नाही. पण, बाकीच्यांचे आका कोण आहेत हे देखील शोधलं पाहिजे,” असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

विधिमंडळ सदस्यांनी लोकभावनेचा विचार करावा – तटकरे

सर्वच आमदार माजलेत अशी लोकांमध्ये भावना झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, ते त्यांनी मत व्यक्त केलं. अलीकडच्या काळामध्ये ज्या दुर्दैवी घटना विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्या. काही विधानसभा सदस्यांकडून घडल्या, याचा स्पष्ट असा अर्थ आहे की, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे जे सदस्य निवडून गेले आहेत, त्यांनी लोक भावनेचा विचार नेहमी मनामध्ये ठेवला पाहिजे. कालची घटना निंदनीय आहे, या घटनेचा राष्ट्रवादी पक्ष म्हणून मी निषेध केला आहे. मी पण गेली 25 वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं. लोकप्रतिनिधींबाबत एक आदर जो जनतेच्या मनामध्ये होता, अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना, काही विशिष्ट, काही ठराविक, सर्व लोकप्रतिनिधींकडून नाही. ठराविक लोकप्रतिनिधीकडून ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या अत्यंत दुर्देवी आहेत असेही तटकरे यांनी म्हटले.

हेही वाचा

मुंबईत डान्सबार, 22 बारबाला; गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, खोटे कागदपत्र दाखवून माझ्या आईची बदनामी केली

आणखी वाचा

Comments are closed.