शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?


सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार (शरद पवार) सध्या राज्यसभा खासदार असून पुढील वर्षी म्हणजे येत्या 6 महिन्यात त्यांची खासदारकीची मुदत संपत आहे. मात्र, त्यांच्या संसदेतील सदस्यपदाची काळजी चक्क भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लागून राहिली आहे. शरद पवार किंवा अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर सातत्याने टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी (Gopichand padalkar) शरद पवार यांच्या खासदारकीबाबत वक्तव्य केलं आहे. 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे म्हणत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून सभागृहात पोहोचणाऱ्या शरद पवारांनी 2019 मध्ये राज्यसभेतून खासदारकी घेतली होती.

शरद पवार यांची खासदारकी 2026 मध्ये संपत असताना आता ते पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार? असा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. माळशिरस येथील पाणीवमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात ही काळजी बोलून दाखवली. त्यानंतर त्यांना याबद्दल विचारले असता केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीकडेही इतर मते आहेत याची आठवण करून दिल्यावर, त्यातूनही पवार निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे मला त्याची काळजी पडली आहे असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. सोलापूर जिल्ह्यातच पवारांचे तुतारी च्या आमदार सर्वाधिक आहेत, पण तुतारीवाले आमदार सातत्याने भाजपच्या संपर्कात असतात आणि भेटीगाठी करीत असतात, अशी शेरेबाजी करत पडळकर यांनी तुतारीवाले आमदार नेमके कुठे असतात हे तुम्हालाच माहिती, असा टोला लगावला. त्यामुळे, शरद पवारांची 2026 मध्ये खासदारकी कशी येणार असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचेही पडळकर यांनी म्हटले.

पंढरपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

दरम्यान, पंचायत राज निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात पंढरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना व मनसे एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, काँग्रेसचे भगीरथ भालकेअजित दादा पवार गटाचे उपाध्यक्ष कल्याणराव काळे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महेश साठे आणि मनसेचे नेते दिलीप धोत्रे एकत्र आले आहेत. सत्ताधारी भाजपच्या आजी-माजी आमदार सॅटिस आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या विरोधात विरोधकांसह महायुतीचे मित्र पक्षही एकत्रित आल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार

आणखी वाचा

Comments are closed.