मुंबई गुरजरातला मिळवण्याचा डाव, बाहेरची माणसं मतदारसंघ बनवतायेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज ठाकरे: कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं. आम्ही काही घेतलं तरच  तुमचीदुकाने चालणार ना. महाराष्ट्रात शांततेने राहा असे ठाकरे म्हणाले. मस्ती करणार असेल तर दणका बसणार म्हणजे बसणारच असे ठाकरे म्हणाले. सगळे मतदारसंघ अमराठी लोकांचे करायचे आहेत. बाहेरची माणसं नुसती येत नाहीत तर हे मतदारसंघ बनवत आहेत. त्यानंतर त्यांचेच नगरसेवक, आमदार आणि खासदार होणार, तुम्हाला फेकून देणार असे ठाकरे म्हणाले. षडयंत्र ओळखा, मुंबई गुजरातला मिळवण्यासाठी हा खाटाटोप सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

हिंदीने 250 भाषा मारल्या, हिंदीमुळं नट नट्यांचं भलं झालं

एका मिठाईवाल्याचा कानाखाली लावली तर देशात बातमी होते. महाराष्ट्रात अमाराठी लोकांना कसे मारतात हे चित्र रंगवल जात आहे. देशात काय राजकारण आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो आपण. हिंदीला 200 वर्षात इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी सांगितलं होतं की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. दर्जा दिला आहे अद्याप एक रुपयाही आला नाही. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 1400 वर्षाचा इतिहास असणं गरजेचं आहे. हिंदाला हा दर्जा देण्यासाठी आणखी 1200 वर्ष आहेत. हिंदी भाषेमुळं नट नट्यांचं भलं झालं, या पलिकडे कोणाचं भलं झालं? असा सवाल राज ठाकरेंनी केला. हिंदीने 250 भाषा मारल्याचे ठाकरे म्हणाले. आमची सत्ता रस्त्यावरती आहे. 56 इंचाची छाती काढून तुम्ही पण फिरा. हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. माज दाखवत अंगावर येणाऱ्याला ठेचायचं असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे तडजोड करणार नाही

कोणाशी माझी मैत्री असो वा दुश्मनी असो, महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे कधीही तडजोड करणार नाही असे ते म्हणाले. जास्तीत जास्त प्रमाणात कायमस्वरुपी तुम्ही मराठीत बोला. समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी, राज ठाकरेंचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न तरी करावा असा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यादिवशीच्या मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घेतला होता असे राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्री म्हणाले त्रिभाषासूत्री करणारच, राज ठाकरेंचा इशारा; करुन दाखवा, दुकानंच नाही तर शाळाही बंद करू

आणखी वाचा

Comments are closed.