पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटे 3.20 वाजता छापा; रेव्ह पार्टी सुरू असलेल्या रूम नं. 102 मध

पुणे : पुणे शहरातील खराडी भागात घडलेल्या एका घटनेनं राज्य हादरलं, खराडीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune News) रेव्ह पार्टीवर कारवाई केली, आणि या घटनेनं एकच खळबळ उडाली, त्याचं कारण म्हणजे या कारवाईत बडे नेते एकनाथ खडसेंच्या जावई प्रांजल खेवलकरसह (Pranjal Khewalkar) 7 जणांना पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. रविवारी खराडी परिसरातील स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजक हे माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे होते अशी माहिती देखील समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांच्या नावे 3 दिवसांपासून पार्टी सुरू असलेल्या हॉटेलच्या 3 रुम बुक होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली त्याच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत. तर पोलिसांनी या पार्टीवर कारवाई करत हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा, कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे 3.20 वाजता स्टे बर्ड हॉटेलवर छापा टाकला. खेवलकर यांच्या नावाने बुक केलेल्या रूम नं. 102 मधून डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (41, हडपसर), सिगारेट व्यावसायिक निखिल जेठानंद पोपटाणी (35, पुणे), हार्डवेअर व्यावसायिक समीर फकीर महमंद सय्यद (41, पुणे), सचिन सोनाजी भोंबे (42, वाघोली), बांधकाम व्यावसायिक श्रीपाद मोहन यादव (27, रा. आकुर्डी) यांच्यासह ईशा देवज्योत सिंग (22, रा. औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (23, म्हाळुंगे) या सात जणांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना माहिती कशी मिळाली?

या हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल पार्ट्या सुरू असतात अशी टीप गुन्हे शाखेला मिळाली होती. दोन दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. त्याचबरोबर या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत  2.70 ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, 70 ग्रॅम गांजासदृश पदार्थ, 10 मोबाइल, दोन चारचाकी वाहने, हुक्का पॉट, दारू व बीअरच्या बाटल्या, हुक्का फ्लेवर असे 41 लाख 35 हजार रुपयांचे अमली पदार्थ, साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

कोण आहे प्रांजल खेवलकर?

प्रांजल खेवलकर हा शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे. पत्नी जरी राजकारणात असली तरी ते मात्र राजकारणापासून दोन हात लांब आहेत, प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसेंचे बालमित्र आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी यांनी बालमित्र असलेल्या प्रांजल खेवलकरसोबत लग्नगाठ बांधली.

हॉटेल बुकींगही खडसेंच्या जावयाच्या नावावर

ज्या ठिकाणी पार्टी सुरू होती त्याचं बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने केल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलच्या बुकिंगच्या पावत्या देखील समोर आल्या आहेत.  25 ते 28 जुलै पर्यंत हे बुकिंग करण्यात आलेलं होतं. रूम नंबर 101 आणि रूम नंबर 102 खेवलकर यांच्या नावाने बुक होत्या. 10 हजार 357रुपये असे याचे भाडे होते. एका रूमचे बुकिंग 25 ते 28 तर दुसऱ्या रूमचे बुकिंग 26 ते 27 जुलै दरम्यान करण्यात आलं होतं. या माहितीनंतर आता ही पार्टी प्रंजल खेवलकर यांनीच आयोजित केली होती अशी माहिती आहे.

पार्टीनंतर पुन्हा पार्टी

रविवारी स्टे बर्ड येथे येण्यापूर्वी सातही जण शहरातील कल्याणीनगर परिसरातील एका पबमध्ये मध्यरात्री दीडपर्यंत पार्टी करत होते. पब बंद झाल्यावर ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले. तेथे पार्टी करून सातही आरोपी स्टे बर्ड येथे प्रांजल खेवलकरच्या नावाने बुक असलेल्या रूममध्ये गेले. तेथे पुन्हा त्यांनी पार्टीला सुरुवात केली. साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी तेथे जात कारवाई केली.

जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसे काय म्हणाले?

एकनाथ खडसे म्हणाले की, हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. माझ्या जावयाला मुद्दाम यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असेल तर मी समर्थन करणार नाही. गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसे काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसे काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.

गिरीश महाजन या घटनेवर काय म्हणाले?

खडसे यांनी जावयाला आधी सावध करायला हवे होते. रेव्ह पार्टीत कोणी कोणाला कडेवर उचलून नेत नाही, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. हा ट्रॅप होणार हे त्यांना माहीत होते तर जावयांना सांगायचं होतं, त्यांना अलर्ट करायचं होतं, त्यांना सांगायला हवं होतं हे, असं कसं होऊ शकतं, खडसे यांचे जावई हे कोणी लहान नाहीत, त्यांना कडेवर उचलून तिथे ठेवले नाही. हे असं कसं होऊ शकतं. या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे, असंही पुढे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

खेवलकरसह सात जणांना दोन दिवस पोलिस कोठडी

या प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अटकेत असलेले निखिल पोपटाणी, श्रीपाद यादव यांच्यावर यापूर्वी पुण्यासह मुंबईत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातही जणांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडे मिळालेले अमली पदार्थ कोठून आणले, त्याचा तपास करायचा आहे. स्टे बर्ड हॉटेलमध्ये 25 ते 28 जुलै दरम्यान तीन रूम बुक केल्या आहेत. हॉटेलच्या आवारात तीन महिला येऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याबाबत चौकशी करायची आहे. पोपटाणी आणि यादव हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे. जप्त केलेले गांजा व कोकेनसदृश पदार्थ अवैध व्यवसायासाठी संगनमताने टोळी निर्माण केली आहे काय, याचा तपास करायचा आहे. आरोपींनी अंमली पदार्थांच्या गैख्यवहारातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता जमा केली आहे काय, याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खेवलकरांच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

खेवलकरच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले, आरोपीने अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही किंवा त्यांच्याकडे अंमली पदार्थ मिळालेला नाही. द्वेषापोटी त्यांना गुन्ह्यामध्ये अडकवले जात आहे. युक्तिवाद ऐकल्यानंतर सात जणांना दोन दिवस पोलिस कोठडी ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग सत्र न्यायाधीश एन. बी. बारी यांनी दिला.

https://www.youtube.com/watch?v=xd7mggop__8

आणखी वाचा

Comments are closed.