पृथ्वीराज चव्हाण थिंक टँक नव्हे सेप्टिक टँक, प्रकाश महाजनांचा हल्लाबोल

पृथ्वीराज चवनवरील प्रकाश महाजन: मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी (Malegaon Blast Case) संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने दिला. या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भगवा दहशतवाद हे म्हणू नका तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा, असे विधान केले होते. आता या वक्तव्यावरून मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

प्रकाश महाजन म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी सोयीस्करपणे हा शब्द पुढे आणलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे एकेकाळी स्वतःला काँग्रेसची थिंक टँक समजत होते. पण, त्यांनी सनातनी हा शब्द वापरून ते काँग्रेसची थिंक टँक नसून सेफ्टिक टँक सारखे असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद हा शब्द वापरला होता. त्यांनी परवा एका मुलाखतीत सांगितलं की, पक्षश्रेष्ठींनी मला सांगितले होते. मग काँग्रेसची हिंमत आहे का की जसा भगवा आतंकवाद म्हणतात तसा हिरवा आतंकवाद तुम्ही म्हणणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसला हिंदूंनाच बदनाम करायचं

भगवा आतंकवाद म्हटल्यानंतर हे आपल्यावर उलटेल म्हणून त्यांनी भगवा आतंकवाद म्हणू नका. कारण भगवा हा रंग शिवाजी महाराजांचा होता, असे म्हणत भावनिक मुलायमा दिला. सनातन आतंकवाद म्हटले. पृथ्वीराज चव्हाण आपण इतके सुशिक्षित आहात. आपण इतके शिकलेले आहात. सनातनी परंपरा फक्त भारतात आहे. सनातन परंपरा मानणारा फक्त हिंदू आहे. तुम्हाला हिंदू अतिरेकी आहेत असे म्हणायचे आहे का? तुम्हाला हिंदूंना बदनाम करायचे आहे. काँग्रेस पहिल्यापासून हिंदूंच्या विरोधात आहे. कारण त्यांना मतांचे राजकारण करायचे आहे. हे मतांचे लांगुलचालन आहे. त्यामुळे ते अशी भूमिका घेत आहेत, असा हल्लाबोल देखील प्रकाश महाजन यांनी केला.

आता पृथ्वीराज चव्हाणांना राहुल गांधी सोयीचे झालेत

महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू समजत होते. यावर तुमचे काय म्हणणे आहे? असा सवाल देखील त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला. महात्मा गांधींनी सनातनी परंपराचा अभिमान बाळगलेला आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यांना महात्मा गांधी सोयीचे नाही. राहुल गांधी सोयीचे आहेत. त्यामुळे राहुल गांधींना काय आवडते तेच पृथ्वीराज चव्हाण आता बोलत आहेत, असे देखील प्रकाश महाजन यांनी म्हटले.

नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, भगवा शब्द कृपा करुन वापरु नका. भगवा शब्द हा महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी पवित्र शब्द आहे. भगवा रंग हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे. शिवछत्रपती यांचे कार्य महाराष्ट्राला स्वातंत्र्य देण्याचं कार्य होतं. स्वातंत्र्या लढ्याविरोधात,इंग्रजांविरोधापूर्वीचा हा लढा आहे. हा रंग आहे वारकरी संप्रदायाचा, हा रंग संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचा आहे. त्यामुळे कृपा करुन आतंकवादाला रंगाशी जोडू नका. मी माझ्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनाही विनंती करतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर सनातनी आतंकवादी म्हणा, हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा. पण रंग देऊ नका. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी पवित्र रंग आहे. हा शिवरायांचा रंग आहे, स्वातंत्र्य लढ्याचा रंग आहे. आतंकवादाला धर्म नसतो, जात नसते, आतंकवादी हा मर्डरर असतो, खुनी असतो. स्वतंत्र भारतातील पहिली आतंकवादी घटना ही नथुराम गोडसे नावाच्या माणसाने घडवली. राष्ट्रपित्याचा त्याने खून केला. तिथून आतंकवादाला सुरुवात झाली. तो कोणत्या धर्माचा होता? त्याने गोळी घालण्यापुरतं धर्मपरिवर्तन केलं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिंदे गट आक्रमक

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने मुंबईतील टिळक भवनावर मोर्चा काढला आहे. मात्र, पोलिसांनी टिळक भवनापासून काही अंतरावर हा मोर्चा रोखला. आम्हाला काही जणांना टिळक भवनात जाऊ दे, अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांनी त्याला नकार दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=5vx2g4mxaja

आणखी वाचा

Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

आणखी वाचा

Comments are closed.