ग्रामसेवक विधवा महिलांचा छळ करतो, पैसे मागतो म्हणून तशी भाषा वापरली, मेघना बोर्डीकरांचं स्पष्ट
मेघाना बोर्डीकर आणि रोहित पवार: राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केला होता. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कालपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
बोरी मोठं गाव आहे, गावची लोकसंख्या 20 हजारांची आहे. त्याठिकाणी मागे पुढे काय बोलली, हेदेखील तुम्ही बघितला पाहिजे होते. जेव्हा रोज मोलमजुरी करुन या पात्र लाभार्थी महिला आहे, त्यांना ग्रामसेवक सांगतो, अमुकतमुक व्यक्तीचा घरी जा, तरच तुम्हाला देतो, टाळाटाळ करतो, पैशांची मागणी करतो. या सगळ्या महिला मोलमजुरी करणाऱ्या , कोणी विधवा होत्या. त्या सगळ्या माझ्याकडे येऊन रडत होत्या. माझा तो त्रागा मी जे बोलले, ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी बोलले. माझ्यासोबत व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी, सीईओ, बीडीओ होते. हा ग्रामसेवक कोणाचं तरी ऐकून गरिबांना त्रास देत आहे. गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, असेही मी व्हिडीओत बोलले आहे, असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले.
Meghana Bordikar news: मेघना बोर्डीकर व्हिडीओत नेमकं काय म्हणाल्या?
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता. या कार्यक्रमात भाषण करताना मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्याचे दिसून आले. त्यांनी म्हटले की, “असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन पगार कोण देते हा आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी”, असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले होते.
हा व्हिडीओ ट्विट करत मेघना बोर्डीकर यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडले होते. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.
https://www.youtube.com/watch?v=gonvrmsxy5y
आणखी वाचा
कानाखाली मारेन, चमचेगिरी करतो, बडतर्फ करेन, पगार कोण देतो? मंत्री बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या
आणखी वाचा
Comments are closed.