मैत्रिणीसोबत शाळेत जाताना बळजबरीने गाडीत बसवलं, काही अंतरावर नेत विनयभंग, पाईपने मारहाण, बीडमध्
Beed Crime: बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता एक संतापजनक प्रकार घडलाय .बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मैत्रिणीसोबत शाळेत जाताना बळजबरी वाहनात बसवलं अन् ..
बीडमध्ये शाळकरी मुलगी मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना शुभम बोरखेडे, मधुकर केमकर आणि एका अनोळखी मुलांनी शाळकरी मुलीला बळजबरी उचलून वाहनात बसवले. काही अंतरावर नेत तिचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यातील दोघांनी पीडित मुलीला पाईपने मारहाण केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बीडमधील दहशतीचा पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल
बीड शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नुकताच एका तरुणावर हातात कोयते आणि सत्तुर घेऊन हल्ला करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, पुन्हा एकदा बीडमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावून व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला. आणि हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.. या घटनेमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बीडमधील गुन्हेगारी थांबणार कधी? हा सवाल कायम आहे.
आणखी वाचा
Comments are closed.