महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी भारताबाहेर पळणार? ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर महादेव मुंडे यांच्या खुनाचे देखील आरोप होऊ लागले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा आरोपी देश सोडण्याच्या प्रयत्नात याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या सर्व आरोपावर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात थेट सीबीआयची चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे.

भर पावसात केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर सरकार खडबडून जागे झाले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटीसाठी बोलावले गेले. महादेव मुंडे यांच्या मृतदेहाचे फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे देखील डोळे पाणावल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंडे प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत आणि संतोष साबळे यांच्या एसआयटीची तात्काळ घोषणा केली.

गोट्या गितेचा व्हिडीओ व्हायरल

त्यातच वाल्मिक कराडचा राईट हॅन्ड असणारा ज्ञानोबा उर्फ गोठ्या गीत्तेचा आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ परळी जवळील मालेवाडी रेल्वे पटरीवरचा होता. यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील गोट्या गीतेच्या गुन्ह्याची माहिती एक्स पोस्ट करत दिली.

सामाजिक कार्यकर्ते असलेल्या बाळा बांगर यांनी माध्यमांसमोर येत गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकांनी मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली असल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली.

महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची हीच वेळ

महादेव मुंडे प्रकरणात नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी रात्री एक्स वर पोस्ट करत महादेव मुंडे यांचे मारेकरी प्रदेशात पळून जाणार असल्याचा दावा केला. इतकंच नाही तर तर हे वाल्मिक कराडचे नातेवाईक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सरकारने कुमावत यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या एसआयटीने देखील याची दखल घ्यावी असे म्हणत मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची हीच वेळ असल्याचे रोहित पवार म्हणाले.

सीबीआय चौकशी करा, वाल्मिकच्या मुलाची मागणी

एकीकडे महादेव मुंडे कुटुंबीयांकडून वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबांवरचे आरोप केले जात होते. ते सगळे आरोप वाल्मिकचा मोठा मुलगा सुशील कराड याने फेटाळून लावत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. या प्रकरणात माझ्या वडिलांचा आणि आणि आमचा संबंध नसल्याचं सुशील म्हणाला. इतकंच नाही तर आम्ही कुटुंबीय याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे सांगत ज्ञानेश्वरी मुंडे यांना मुंडे प्रकरणाबाबत त्यांना ऑफर देणाऱ्याचे नाव जाहीर करण्याचं थेट आव्हान केलं

ऑफर देणाऱ्याचे नाव बसा प्रमुखांना देणार

सुशील कराडने आरोप फेटाळल्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुन्हेगार कधीही मी गुन्हा केला असे म्हणत नसल्याचे सांगितले. बंगल्यावरून फोन कोणी केला असेही त्या यावेळी म्हणत खून पचवण्याची क्षमता कोणात आहे हे सगळ्या परळीला माहीत असल्याचं आरोप केला. सुशील कराडने केलेला ऑफरच्या आरोपावर, ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीचे नाव आम्ही एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांना सांगणार असल्याचे त्या म्हणाले.

मागील 21 महिन्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबीयांनी लढा उभारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली. एसआयटीची स्थापना देखील केली मात्र. एसआयटी स्थापन करूनही जर आरोपी भारताबाहेर फरार होत असल्याचे रोहित पवार यांचा दावा खरा असेल तर पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून कारवाई करायला पाहिजे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.