तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना ‘डिजिटल अरेस्ट’; कोट्यव
नाशिक गुन्हा: ‘तुमच्या नावावर बनावट बँक खाते उघडून त्याद्वारे दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक व्यवहार सुरू आहेत’, अशी भीती दाखवत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी नाशिक शहरातील चार नागरिकांना ऑनलाईन फसवले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) होणार असल्याचा बनावट व्हिडीओ कॉल करून तब्बल 1 कोटी 28 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Nashik Crime News)
या फसवणुकीत एका महिलेचाही समावेश असून, वेगवेगळ्या चार प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आली आहे. एका प्रकरणात 50 लाख, दुसऱ्या प्रकरणात 36 लाख तिसऱ्या प्रकरणात 33 लाख तर चौथ्या प्रकरणात 9 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रकरण 1 : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक
सावकरनगरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाला मुंबई क्राइम बँचचा अधिकारी असल्याचे सांगून संपर्क करण्यात आला. अटक वॉरंट दाखवत, दोन वेळा 25 लाख रुपये, एकूण 50 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करायला लावण्यात आले.
प्रकरण 2 : वकिलाला 36 लाखांचा गंडा
गंगापूर रोडवरील एका वकिलाला कॉल करून “मी एनआयए अधिकारी बोलतोय” असे सांगण्यात आले. त्याच्याविरोधात अटक वॉरंट असल्याची भीती दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्याकडून दोन टप्प्यांत 36 लाख 66 हजार रुपये उकळण्यात आले.
प्रकरण 3 : गृहिणीकडून 33 लाख रुपये उकळले
टागोरनगरातील एका गृहिणीला सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून कॉल करण्यात आला. तिच्या आधार व सिमकार्डचा वापर ‘टेरर फंडिंग’साठी झाल्याचे खोटे सांगून तिला दोन दिवस घरातच डांबले आणि 33 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.
प्रकरण 4 : लेखानगरातील महिलेला 9 लाखांचा गंडा
लेखानगर येथील एका महिलेला दिल्ली क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून संपर्क केला गेला. तिला अटक होणार असल्याची भीती दाखवत 9 लाख 38 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले.
अशी झाली फसवणूक
या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हेगारांनी अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल केले. यामध्ये ते पोलीस वर्दीत दिसत होते, त्यांच्याकडे तपास यंत्रणांचे बनावट लोगो, ओळखपत्रे आणि लेटरहेड होते. त्यांनी पीडितांना सांगितले की, त्यांच्या नावावर बनावट खाते उघडण्यात आले असून ते दहशतवादासाठी वापरले जात आहे. या भीतीच्या वातावरणात, आरोपींनी पीडितांकडून पैसे ट्रान्सफर करून घेतले. मोबाइलवर तपास यंत्रणेचा लोगो वापरणे, खोटे ओळखपत्र दाखवणे आणि खातं सील होणार असल्याचा दाखला देऊन नागरिकांना आर्थिक नुकसान केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणाचा तपास नाशिक सायबर पोलिसांकडून सुरु आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.