वैद्यनाथ बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, पंकजा मुंडेंचे पारडं जड; शरद पवार गटाचे पॅनल पिछाड
बीड: बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे पारडे जड आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे. अनेक ठिकाणी पवार गटाच्या उमेदवारांना खाते देखील उघडता आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल. तर निवडणुकीपूर्वीच माजी खासदार प्रीतम मुंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरासरी एकूण 37.5 टक्के इतके मतदान झाले आहे.
वैद्यनाथ बँक निवडणुकीत 37.5 टक्के मतदान
वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण 43 हजार 962 मतदारसंख्येपैकी 16 हजार 287 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली आहे. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी स्पर्धा होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.
आता, मतदान केलेल्या मतदारांनी कोणाला प्राधान्य दिले याचे चित्र आज बीड येथे होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतर वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळावर कोणाचे वर्चस्व राहणार हे ठरणार आहे. मात्र आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडेंचे पारडे जड असून शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे.
आणखी वाचा
Comments are closed.