दादरच्या कबुतरखान्याजवळ मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड; मंगलप्रभात लोढा म्हणाले…
कबूटर खाना दारक मुंबई: कबुतरखाना बंदीच्या (Kabutar Khana Dadar) समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच आंदोलनाच्या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या या नोटिसानंतरही दादर कबुतरखाना परिसरात आंदोलक जमायला सुरुवात झाली. यानंतर पोलिसांकडून आंदोलक ताब्यात घेण्यात येत आहे. यावेळी हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. तर मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्याकडून दादर कबुतरखाना प्रकरणी चुप्पी पाहायला मिळाली. मंगलप्रभात लोढा यांना आजच्या आंदोलनाबाबत विचारले असता, मला त्यावर काहीही बोलायचे नाही, असं सांगितले.
दादरचा कबूतर खाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. या पोलिसांच्या या नोटिसेनंतरही कबुतरखान्याजवळ सकाळी 11 नंतर आंदोलक जमण्यास सुरुवात झाले. यानंतर तात्काळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला-
कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन पुकारण्यात आलं होतं. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मराठी एकीकरण समितीने मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं आहे. याचपार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखान्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आला आहे.
कबुतरखाना परिसरातील दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश-
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबुतरखाना परिसरातील दुकान दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 150 मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, व्हि बी नगर, माहिम, कुर्ला पोलिस ठाण्यातील पोलीस बंदोबस्ताला आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या पोलिसाचीही वाढीव कुमक या ठिकाणी बोलवण्यात आली आहे. कबूतरखाना परिसराला आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर छावणीचे स्वरुप पाहायला मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?, कोर्टाने काय म्हटलं?
दरम्यान, 3 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री उदय सामंत (शिवसेना नेते) यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका असल्याने मुंबईतील 51 कबुतरखाने तात्काळ बंद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर, बीएमसीने शहरातील कबुतरखान्यांविरुद्ध मोहीम सुरू केली ज्या अंतर्गत कबुतरांना खायला घालणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आणि कबुतरखान्याना बंद करण्यात आले. दादर पश्चिम येथील कबूतरखाना पालिकेने ताडपत्री लावून बंद केला. या नंतर जैन धर्मीय यांच्याकडून थेट कबुतरखाना खुला करावा म्हणून आंदोलन झाले आणि त्यांनी दादर येथील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुन्हा कोर्टात सुनावणीला गेले आणि न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी 31 तारखेला होईल, असे म्हणत आंदोलनावर ताशेरे ओढले. कबूतरखाने बंदच राहतील, असे आदेश देखील न्यायालाने दिले. कोर्टाने दिलेले आदेश असताना ही, आता अनेक जणांकडून युक्त्या लावून कबुतरांना धान्य टाकण्याचे पराक्रम सुरूच आहेत. काही जण गच्चीवर कबूतरांना धान्य देत आहेत तर काही गाडीच्या छतावर. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
https://www.youtube.com/watch?v=j5nrnr-_rr0
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.