लाखो वाहनधारकांना दिलासा, HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पॅट बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि हाय पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी)) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नियुक्ती घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) नाही बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर एअर व्होव्हग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापिदिनांक 30?11?2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी नियुक्ती मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
लाखो वाहनधारकांना दिलासा
राज्य सरकारनं यापूर्वी 01?04?2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, मोठ्या संख्येनं वाहनधारकांनी एचएसआरपी क्रमांक प्लेट बसवली नव्हती. आता मुदत संपण्यास एका दिवसाचा कालावधी बाकी असतानाच राज्य सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना राज्य सरकारनं दिलेल्या मुदतवाढीच्या काळात एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावा लागतील. आता 30 नोव्हेंबर पर्यंत या नंबरप्लेट बसवून घ्यावा लागणार आहेत.
1 डिसेंबरपासून कारवाई करण्यात येणार
महाराष्ट्र शासनानं एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ जवळपास साडे तीन महिन्यांची आहे. तोपर्यंत वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत जे वाहनधारक अशी अपॉइंटमेंट घेतील. त्यांना सोडून जे वाहनधारक नंबर प्लेट बसवणार नाहीत किंवा अपॉइंटमेंट घेणार नाहीत त्यांच्यावर 1 डिसेंबरपासून कारवाई केली जाणार आहे.
मुदतवाढ देण्याची जयंत पाटील यांची मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एचएसआरपी क्रमांक प्लेट्स बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. राज्यात हाय सिक्युरिटी नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची अंतिम मुदत 15 ऑगस्ट, 2025 रोजी संपत आहे. ज्या वाहनांवर ही नंबरप्लेट बसवणे गरजेचे आहे त्यांची संख्या अजूनही मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांवर 10 हजार रुपयांचा भुरदान एन द्या, गवत सिक्युरिटी नोंदणी प्लेट्स बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, ही विनंती करतो, असं जयंत पाटील यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं.
वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असली तरी तांत्रिक अडचणींमुळे आणि किचकट प्रक्रियेमुळे त्या बसविण्यात त्यांना अडचणी येत आहेत. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70 टक्के जुन्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट्स अजूनही बसवलेल्या नाहीत. त्यामुळे सरसकट कारवाई न करता, शासनाने मुदतवाढ देण्याची गरज आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.
आणखी वाचा
Comments are closed.