‘ठाकरे ब्रँड नष्ट करायचे सोडा आपणच नष्ट होऊ या भीतीने काही लोक…’, भास्कर जाधवांनी प्रसाद लाडा

मुंबई: मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)  यांनी टीका केली. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लगावत लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. त्यावरती आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे. ठाकरे ब्रँड मुंबईतून नष्ट करू असे कोणतरी बोलतं याचा अर्थ ठाकरे ब्रँड आहे असं ते मान्य करता, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड नष्ट करायचे सोडा आपणच नष्ट होऊ या भीतीने काही लोक अशी वक्तव्य करतात, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

भाजप पक्षात सर्वात जास्त वाईट कोण बोलतं याची स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. देशात सध्या सामाजिक सलोखा बुडवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होत आहे, त्यांचा हा छुपा अजेंडा मागील शंभर वर्षांपासून सुरू आहे, भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना शब्द देऊन सरकारकडून सतत फसवणूक झाली, सरकारच्या GR वर विश्वास ठेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलं होतं, असंही भास्कर जाधव म्हणाले.

राज्यसरकार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची बदनामी करण्याचे काम करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला स्पर्श करून आरक्षण देऊ असे सरकारने जरांगे पाटील यांना दिला होता. हे सरकार एका बाजूने काही लोकांना चिडवतंय आणि काही लोकांना चढवतंय. सरकारचा फसवणुकीचा धंदा सतत होत राहिला आहे, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे या मतावर मी ठाम आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)  यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे. स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ठाकरे बँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतच्या मुद्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली.

आणखी वाचा

Comments are closed.