मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात; चिपळूणमध्ये जागीच 5 जणांचा मृत्यू, लातूर जिल्ह्यात ट्रॅव

पुणे: राज्यात काल(सोमवारी,ता 18) रात्री उशिरा दोन मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण कराड मार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात 5 जण ठार झाले आहेत. गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकवरती रिक्षा आणि थार जोरदार आदळल्या, या घटनेमध्ये रिक्षातील चार तर थार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, काल(सोमवारी,ता 18) रात्री उशिराची ही घटना घडली आहे. तर लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी येथे मध्यरात्री श्रेयश ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला अपघात झाला. लातूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या या बसने सीएनजी सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. बस मध्ये एकूण 30 प्रवासी, दोन वाहक आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. त्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काहींना किरकोळ मार लागला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे.

चिपळूण कराड मार्गावरील अपघातात 5 ठार

चिपळूण कराड मार्गावर तिहेरी अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकवर रिक्षा आणि थार जोरदार आदळल्या. यामध्ये रिक्षातील चार तर थार मधील एकाच जागीच मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. भरधाव थार चालकाच्या चुकीमुळे रिक्षामधील प्रवासी हकनाक दगावले आहेत. चिपळूण कराड मार्गावरील पिंपळी येथील ही दुर्दैवी घटना आहे.
मृतांमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे, थार कारसह रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

लातूर-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात

लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी मध्यरात्री श्रेयश ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला अपघात झाला. लातूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या या बसने सीएनजी सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णवाहिका तातडीने दाखल होऊन जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी औसा येथे हलविण्यात आले आहे.
बस मध्ये एकूण 30 प्रवासी, दोन वाहक आणि एक सहाय्यक प्रवास करत होते. त्यातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काहींना किरकोळ मार लागला असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर अनेक किरकोळ जखमी प्रवाशांनी लातूरला परतण्याचा निर्णय घेतला. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि महामार्गावरील वाहनांचा वेग यामुळे चालकाला वेळीच वाहन थांबवता आले नाही, आणि त्यामुळेच हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.