पतीकडून झोपेत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या, सकाळी स्वत:हून पोलिसात हजर; जळगाव हादरलं
जलगाव गुन्हा:जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक कलह, संशय आणि पैशाच्या तगाद्यातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. या भयानक कृत्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. (Crime News)
झोपेत असलेल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला
नितीन शिंदे असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नी कवितावर धारदार शस्त्राने निर्दयीपणे हल्ला केला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असलेल्या नितीनने तिला वारंवार मारहाण केली होती. याशिवाय घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तो तगादा लावत होता. या वादातूनच त्याने पत्नीचा जीव घेतला, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
खून करून थेट पोलिस ठाण्यात हजर
पत्नीचा खून केल्यानंतर नितीन शिंदे थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला. स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपासणी सुरू केली आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरावे गोळा करण्यात येत असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
मयत कविता हिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती नितीन शिंदे आणि त्याची आई (सासू) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीवर झालेल्या अत्याचार, चारित्र्यावरचा संशय आणि आर्थिक तगादा या कारणांमुळे हा खून घडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
गावात भीतीचे वातावरण
या हत्याकांडाने लोहारा गावासह संपूर्ण पाचोरा तालुका हादरून गेला आहे. घरगुती कलहातून एका स्त्रीचा असा बळी गेला, याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय धक्काडाईक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या (Beed Crime News) केलीय. हि घटना गेवराई (Georai) तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे? सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.