लोणावळ्यात भरदुपारी ‘लेडीज फ्री-स्टाईल फाईट’! दारूच्या नशेत तरूणींचा रस्त्यावर धिंगाणा, वाहतूक
लोणावळा: पुणे जिल्ह्यातील पर्यटननगरी लोणावळा… जिथे सहसा पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात. पण आज इथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, अगदी फ्री-स्टाईल तरूणींची हाणामारी लोणावळाकरांना बघायला मिळाली. काही पर्यटक तरूणी दारूच्या नशेत रस्त्यावर उतरल्या… आणि एकमेकींना मारहाण करत अक्षरशः कुस्ती सुरू केली. जुना पुणे मुंबई महामार्गावर ए-1 चिक्की दुकानासमोर घडलेल्या या तमाशामुळे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली. परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
नेमकं काय घडलं?
परिसरात गाड्यांचे हॉर्न आणि तरूणींचा आरडाओरडा सगळं मिळून दुपारचं वातावरण अक्षरशः गोंधळलेलं होतं. हाकेच्या अंतरावर असलेल्या लोणावळा वाहतूक पोलिस घटनास्थळी धावत गेले. मात्र नशेत असलेल्या या पर्यटक तरूणी थांबायच्या नावच घेत नव्हत्या, उलट त्यांचा धिंगाणा पोलीस चौकीपर्यंतच चालू राहिला. शेवटी महिला पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना ताब्यात घेतलं. सध्या या पर्यटक महिलांची चौकशी सुरू आहे, कशावरून इतक्या टोकाची हाणामारी करत होते, याचा तपास लोणावळा पोलीस करतीलच. मात्र या घटनेमुळे लोणावळ्यात पर्यटकांसोबतच स्थानिकांमध्येही मोठी चर्चा रंगली होती.
परिसरात या तरूणींची भांडण आणि वाद, गोंधळ सुरू असताना लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली, यावेळी त्या दोघी एकमेकींचे केस धरून ओढत होत्या, तर इतर काहीजण त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या एकतच नव्हत्या, हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
फ्री-स्टाईल महिलांची हाणामारी लोणावळाकरांना बघायला मिळाली. काही पर्यटक महिला दारूच्या नशेत रस्त्यावर उतरल्या… आणि एकमेकींना मारहाण करत अक्षरशः कुस्ती सुरू केली. #प्यूनिन्यू पृष्ठ Thepter #Police #video pic.twitter.com/yrm377jskt
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 21 ऑगस्ट, 2025
आणखी वाचा
Comments are closed.