लिटमस टेस्टमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रि
राज ठाकरे आणि देवेंद्र फड्नाविस: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) हे गुरुवारी सकाळी अचानक वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे.
राज ठाकरे हे कदाचित गणपतीसाठी घरी येण्याचं आमंत्रण द्यायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. राज ठाकरे यांना कदाचित राज्यातील एखाद्या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीसांशी बोलायचे असेल. फडणवीसांच्या काळात मुंबई दोन दिवस बुडाली होती. राज्यातील प्रमुख शहरं पाण्यात बुडाली होती. याबाबत राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. यापूर्वीही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे भेटले आहेत. आजची भेट कशासाठी आहे, हे राज ठाकरेच सांगू शकतात. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते या भेटीविषयी स्पष्ट आणि परखडपणे बोलतील, असे मला वाटते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही. उद्धव ठाकरे किंवा माझं मुख्यंत्र्यांकडे काम असले तर आम्हीही त्यांना भेटू. बेस्टची निवडणूक इतकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ती एका पतपेढीची निवडणूक होती. त्याची चर्चा आणि महत्त्व बेस्ट आगारापर्यंतच मर्यादित आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Raj Thackeray and Uddhav Thackeray: आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, हे आमचं ठरलंय, राज-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चिंता करायचे कोणतेही कारण नाही. राज्याचा मुख्यमंत्री मुख्य प्रवाहातील नेत्याला भेटतो. यावरुन दरवेळी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. राज ठाकरे यांच्यावर आमचं बंधन नाही, तु्म्ही अमूकतमुक नेत्याला का भेटलात, हे आम्ही त्यांना विचारत नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपलाही यश मिळालेले नाही. तिसऱ्याच आघाडीचा विजय झाला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की, भाजप अपयशी ठरतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
जेव्हा नाती ताणली जातात तेव्हा विश्वास फार मोठी गोष्ट असते. त्यामुळे एवढ्या तेवढ्यावरुन अविश्वास व्यक्त करण्याची गरज नसते. यापूर्वीही राज ठाकरे हे वांद्र्यातील ताज लँडस एन्डस हॉटेलमध्ये फडणवीसांना भेटले होते. आमचं तेव्हाच ठरलं होतं, आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, पण लढणं अपरिहार्य आहे. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या आजच्या भेटीनंतर लगेच युती तुटली वगैरे निष्कर्ष काढू नयेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=X6M82YQQUGUU
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.