राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; ‘वर्षा’वरील बैठकीत काय काय घडलं?

राज ठाकरे यांनी देवेंद्र फड्नाविस भेटले मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईतील वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. साधारण 45 मिनिटं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी शिवतीर्थ या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले.

गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी एक दोन विषयांवर बोलत होतो. 2014 ला मी एक एस्थेटीक विषयावर डॉक्युमेंट्री केली होती, ती इतर भाषेतही करतोय. न प्लॅनींग ह्या गोष्टी माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. मुंबईठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक पुनर्विकास होत आहेत. अनेक अनधिकृत कामं सुध्दा होतायत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या, ह्या सगळ्या गोष्टी रस्त्यावर आल्यात, असं राज ठाकरेंनी सांगितले. 400 मीमी पाऊस पडला, राज्य सरकारने ह्यावर काम केलं नाही. कबुतर , हत्ती या विषयांमध्ये आपण एवढं अडकलोय की इतर गोष्टींवर लक्षच राहिलं नाही. लोकांना पार्किंगबाबत शिस्त लावणं गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातील लोकांना काहीच माहिती नाही, या शहरात कशी पार्किंग केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना मी एक आराखडा दिलाय, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. काही उपाययोजना कराव्या लागतात. पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी काही रंग असले पाहिजेत, असं राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=nejo37ebruy

आणखी वाचा

Comments are closed.