एकीकडे राज ठाकरेंना भेटले, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन; महाराष्ट्राच्या रा

मुंबई: आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली, त्याचबरोबर उपराष्ट्रपतीपदासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना फोन केला असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचा फोन उध्दव ठाकरेंना आल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांवरती सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी आहे, त्यामुळे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीसांनी ठाकरेंना फोन केला होता. राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचे फोन उध्दव ठाकरेंना आलेले आहेत. त्यांनी मतदानासाठी विनवणी केली आहे, इतरांना सुध्दा केले असतील, त्यांचं कामच आहे, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीस मविआतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे, त्याचाच एक भाग म्हणून फडणवीसांनी ठाकरेंना फोन केला आहे.

राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर राऊत म्हणाले?

विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या, असं शिवसेना ठाकरे गटाते खासदार संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत.  कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला

आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीसाठी पोहचले. नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहचले आहेत. मात्र काल बेस्ट पतपेढी निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहचल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत (BEST Election) ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती. मात्र, भाजपचे नेते फक्त उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करताना दिसत होते. राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या बोलण्यात सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर दिसून आला होता. एकाही भाजप नेत्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची हिंमत केली नव्हती. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनीही भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजून पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी नवी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=mxnlhkejava

आणखी वाचा

Comments are closed.