राज ठाकरेंच्या जैन समाजाला कानपिचक्या, म्हणाले, कोण कबुतरावर बसून फिरायला जातं का?

कबूटर खानावरील राज ठाकरे: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन पेटलेल्या वादाबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा, हे कळते. काही जणांना कबुतरांचा (Pigeons) मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. मात्र, त्यांना लक्षात आले की, आमच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा बंगल्यावरुन जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत राजकीय मुद्द्यांवर बोलतील, अशी अपेक्षा होती. परंतु, राज ठाकरे यांनी राजकीय भाष्य करणे पूर्णपणे टाळले. बेस्ट पतपेढीची निवडणूक फारशी महत्त्वाची नसल्याचे आणि त्याबाबत मला माहितीही नव्हते, असे मोघम उत्तर राज ठाकरे यांनी दिले. मात्र, या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुंबईत कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादाबाबत भाष्य केले. (Mumbai Kabutar Khana)

राज ठाकरे यांनी रस्त्यांवर कबुतरांना खाणे घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला (Jain Community) कानपिचक्या दिल्या. त्यांनी म्हटले की, मला एक गोष्ट कळत नाही. तुमच्या घरात चार उंदीर झाले तर आपण  काय करतो, नाय नाय, गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात उंदीर ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत. आज रेल्वेखाली, खड्यात माणसं जातात, माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत, ही मागणी लावून धरली होती. मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच हायकोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखाने बंद करायला सुरुवात केली होती. तसेच रस्त्यांवर कबुतरांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई सुरु केली होती. मात्र, दादरमधील कबुतरखाना बंद करण्यास स्थानिक जैन समाजाने विरोध केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कबुतरांना रस्त्यावर खाणे घालण्यावरील बंदी कायम ठेवली होती.

https://www.youtube.com/watch?v=ypi0cc0zjzg

आणखी वाचा

राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे आराखडाच घेऊन पोहचले; ‘वर्षा’वरील बैठकीत काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.