देशातील सर्वाधिक लखपती कोणत्या राज्यात? कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक आयटी रिटर्न भरतात?
भारतातील सर्वात श्रीमंत लोक कुठं राहतात असा प्रश्न विचारला असता अनेकांना दिल्ली, मुंबई किंवा गुजरात या राज्यांचं नाव समोर येत. मात्र, अलीकडे समोर आलेल्या आकडेवारीतून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतातील प्रत्येक व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 114710 रुपयांवर पोहोचलं आहे. दहा वर्षांपूर्वी ही रक्कम 72805 रुपये होती. म्हणजेच गेल्या 10 वर्षात भारतीयांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 41905 रुपयांनी वाढलं आहे.
यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कोणत्या राज्यातील सर्वाधिक कमाई करतात? कोणत्या राज्यातील सर्वाधिक लोक लखपती आहेत म्हणजेच ज्यांची वार्षिक कमाई 12 लाखांपेक्षा अधिक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यामुळं हे दिसून येईल भारतातील मध्यमवर्ग आणि आर्थिक विकास कुठं होत आहे.
सर्वाधिक लखपती कोणत्या राज्यात?
आयटीआर रिटर्नच्या डेटा आणि करदात्यांच्या प्रमाणानुसार कर्नाटक या यादीत सर्वात पुढं आहे. येथील 20.6 टक्के टॅक्सपेअर्स म्हणजेच करदाते असे आहेत ज्यांचं उत्पन्न 12 लाख ते 50 लाखांच्या दरम्यान आहे. दुसऱ्या स्थानावर तेलंगाना आहे, या राज्यातील 19.8 टक्के करदाते असे आहेत ज्यांचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा अधिक आहे. यानंतर झारखंडची टक्केवारी 19.5 टक्के इतकी आहे, तामिळनाडूची टक्केवारी 18.8 टक्के, दिल्लीची टक्केवारी `17.6 टक्के आहे. भारताची सरासरी 14.1 टक्के आहे. गुजरात आणि बिहार या सारखी राज्य या यादीत खालच्या स्थानावर आहेत. यातून सर्वाधिक श्रीमंत राज्य असलेली राज्य कमी कमाई असलेली राज्य होत आहेत.
कोणत्या राज्यातील सर्वाधिक लोक कर भरतात?
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी टॅक्स रिटर्न भरला आहे, यामध्ये 46 लाख लोकांचा समावेश आहे. लोकसंख्येच्या हिशोबानं पाहिलं असता दिल्ली सर्वात पुढं आहे. येथील 5.9 टक्के लोक टॅक्स भरते. उत्तर प्रदेशात हा आकडा फक्त 1.5 टक्के आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. बिहारची स्थिती सर्वात कमजोर आहे. बिहारमधील 0.8 टक्के लोक कर देतात. केंद्र सरकारच्या मते, राज्यांमध्ये प्रति व्यक्ती उत्पन्नातील अंतर आर्थिक विकासाचे स्तर, प्रशानसाची गुणवत्ता, उद्योगांची संख्या, नोकऱ्यांची संधी आणि सामाजिक संरचना या कारणांमुळं होतो.
आणखी वाचा
Comments are closed.