एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला, बीडमधील घटना
बीड गुन्हा: बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. विलास मस्के असं गंभीर असलेल्या समन्वयकाचे नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून विलास मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवर देखील हल्ला झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी (Police) घटनास्थळाला भेट दिली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या मारहाणीत विलास मस्के गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. धारधार शस्त्राने वार करत ही मारहाण करण्यात आली आहे. बीड जवळील पालवन येथे विलास मस्के यांचे घर आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टोळक्यांनी घराचा दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं.
हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी
याच वेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. विलास मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीड मधील वैद्यकीय मदत कक्षात गेल्या तीन वर्षांपासून काम पाहत आहेत. दरम्यान हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी विलास मस्के यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Beed Crime : प्रेमाच्या त्रिकोणातून होमगार्ड महिलेचा खून
दरम्यान, प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचे नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या. पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या. दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होते. मात्र अयोध्या प्रेमाच्या अडसर येत असल्याने घरी बोलावून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला. दरम्यान, या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. तर यात प्रियकराचा समावेश आहे का? या बाजूने तपास सुरू करण्यात आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.