अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार; दोन दिवसांआधी राज ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भ
Amit Thackeray Meet Ashish Shelar मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) आज मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांआधीच मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (23 ऑगस्ट) अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आजच्या भेटीत अमित ठाकरे मंत्री आशिष शेलार यांच्यासह काय चर्चा करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतलेली?
राज ठाकरे 21 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी गेले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिली. गेले काही महिने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एक-दोन विषयांवर बोलत होतो. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन आज मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, असं राज ठाकरेंनी सांगितले. मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, असं राज ठाकरेंनी सांगितले. सरकाराने तज्ज्ञ लोकांना बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जागांचा विचार केला तर कुंपणच शेत खात आहे. अर्बन नक्षल पेक्षा येथे शिस्त लावा. खोट्या रिक्षा आहे, टॅक्सी आहेत, त्यावर कुठलाही निर्बंध नाहीय, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
अमित ठाकरे-आशिष शेलार भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=vvvpjgilt-i
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.