मनोज जरांगे यांनी कागद अन् पेन घेऊन सरकार समोर आरक्षणबाबत चर्चेला बसावं : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil on Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठा आरक्षण उपसमितीमधून आतापर्यंत खूप काही गोष्टी मराठा समाजाला मिळाल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरेंग पाटील यांनी केलेल्या मागणीतून खूप गोष्टी साध्य झालेल्या आहेत. अशातच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनाची हाक दिली आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. फक्त असं न करता मुंबईला जाणार, उपोषण करणार असे मनोज जरांगे म्हणत असतील आणि सनदशीर मार्ग सोडून जर ते आंदोलन करत असतील तर सरकार कारवाई करायला बसलेच आहे. असे इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनोज जरेंग पाटील यांना दिला आहे? तसेच मनोज जरेंग यांनी कागद, पेन घेऊन आरक्षण बाबत सरकार समोर चर्चेला बसायला हवं, अस आवाहन देखील त्यांनी केलं आहे?

एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? – चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय. मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत. दरम्यान या विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाघ्या तेमराठा आरक्षण बाबत नेमलेल्या उपसमितीवर मी बराच काळ अध्यक्ष होतो, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं. फक्त समितीत मी आहे. माझ्या कार्यकाळात कित्येक नवीन लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंवाय असेही ते म्हणाले?

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू- उदय सामंत

एकंदरीत बघता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीने दिले गेले आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की मराठा आणि ओबीसी समाज दोन्ही घटक महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने सरकारला कशा पुढे नेता येतील ते बघावे लागेल. आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये मला काही पडायचं नाही. फक्तमराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू अशी अभिप्राय उद्योग मंत्री उदय समंता (उदय समंत) यांनी दिली?

आणखी वाचा

Comments are closed.