50 टक्के टॅरिफ लादलं,मृत अर्थव्यवस्था म्हणून हिणवलं, तेच ट्रम्प दरमहा भारतातून किती कमावतात?
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन या उद्देशानं विविध देशांवर टॅरिफ लादलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं असून त्याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून केली जाणार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवलं होतं. तर, भारताची अर्थव्यवस्था मृत असल्याची टीका देखील त्यांनी केली होती. डोनाल्ड ट्रम्प हे राजकीय नेते असल्याबरोबर यशस्वी उद्योजक देखील आहेत. भारतात डोनाल्ड ट्रम्प यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंदर्भात कोणतीही वक्तव्य केली असली तरी भारत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात चांगली पकड आहे. द ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीला अमेरिकेनंतर भारत हे सर्वाधिक आणि सर्वात मोठा नफा देणारं रिअल इस्टेट मार्केट बनलं आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतात जमीन खरेदी करत नाहीत किंवा बांधकामात थेट पैसे गुंतवत नाहीत. ते फक्त त्यांचा ब्रँड ट्रम्प या नावाचा भारतीय डेव्हलपर्सला वापरण्याची परवानगी देतात. त्याच्या बदल्यात मोठी रक्कम आणि विक्रीमध्ये भागिदारी मिळवतात.
एका रिपोर्टनुसार 2024 मध्ये ट्रम्प ऑर्गयनायझेशनला भारतीय प्रोजेक्टमधून 10 लाख डॉलर्सची कमाई झाली. त्यात मंबईतील एका टॉवरच्या निर्मितीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा अधिक होता. 2012 मध्ये द ट्रम्प ऑर्गनायझेशननं भारतात त्यांचा पहिला प्रोजेक्ट लाँच केला होता. 2012-2019 दरम्यान त्यांनी मुंबई, पुणे, गुरुग्राम, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये चार प्रकल्पातून रॉयल्टी आणि फीच्या माध्यमातून 11.3 मिलियन डॉलर ट्रम्प यांना मिळाले. सध्या मुंबई, पुणेगुरुग्राम, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा सारख्या मोठ्या शहरात 13 हून अधिक अलिशान प्रकल्पातून ट्रम्प मोठी कमाई करत आहेत. 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रिअल इस्टेट चा व्यवसाय वाढून 30 लाख स्क्वेअर फुटांपर्यंत वाढवला आहे. 6 नवे प्रकल्प पूर्ण झाल्यास कंपनीचा विस्तार चारपटीनं वाढेल.
आतापर्यंत ट्रम्प यांनी किती रुपये कमावले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीनं भारतातून आतापर्यंत 175 कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत. तर, आगामी प्रकल्पातून त्यांना 15000 कोटींचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. दरमहा विचार केला असता ट्रम्प यांना भारतातून प्रत्येक महिन्याला 10 ते 15 कोटी रुपयांचा फायदा होतो.
आणखी वाचा
Comments are closed.