मराठा मोर्चात सहभागी होणारच, ठाकरे गटाच्या खासदाराने ठणकावून सांगितलं, हाके-सदावर्तेंवरही तोफ ड
जालना: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत. त्यांना थांबवण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहेत. सणासुदीच्या काळात आंदोलन टाळावे, अशीही विनंती सरकारकडून करण्यात आली. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून, आंदोलनाची दिशा आता थेट मुंबईकडे वळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णयाला सत्तेतील आणि विरोधी पक्षातील काही आमदार, खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावरून हाके आणि सदावर्ते यांनी हल्लाबोल केला होता, तसेच जरांगेंना पाठिंबा देण्याआधी तुमच्या पदांचा राजीनामा द्या अशी मागणी हाकेंनी केली होती, अशातच ठाकरे गटाच्या खासदाराने मराठा मोर्चात सहभागी होणार असं ठणकावून सांगितलं आहे.
इतके दिवस सरकारने का काहीच केलं नाही
परभणीतील उबाठा खासदार तथा शिवसेनेचे उपनेते संजय जाधव यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलाचा आंदोलन स्थगित झालं होतं, इतके दिवस सरकारने का काहीच केलं नाही, आणि आता त्यांना ऑन द स्पॉट तुम्ही येवू नका म्हणतात. हे चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा विषय मिटवून पुण्य वाटून घ्यावे. अन्यथा एक दिवस राज्यांमध्ये उद्रेक होईल असेही संजय जाधव म्हणाले आहेत. हाके, सदावर्ते हे लोक सरकारची बाजू घेवून बोलत आहेत. मी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आणि मराठा समाजाने ही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सरकारने ते जातीमध्ये तयार केले आहे.
परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांची सरकारवर टीका करत म्हटलंय, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषय मिटवुन पुण्य वाटून घ्यावे. जरांगे पाटलांच्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे, मराठा समाजानेही सहभागी व्हावे. तुम्ही ऑन द स्पॉट सांगताय मुंबईला जाऊ नका ते जमणार नाही. भाजप देशात आणि राज्यात हुकुमशाहीपेक्षा जुलूमशाही करत आहे. शिंदे समितीची मुदतवाढ हे खेळणे आहे. लोकसभेनंतर जरांगे यांचे आंदोलन स्थगित झाले होते इतके दिवस यांनी काय केले. राज्यात एक दिवशी उद्रेक होणार हे दिसतंय. सरकार जातीजातीत तेढ निर्माण करतंय, असंही पुढे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.
सदावर्ते, लक्ष्मण हाके यांचा विरोध म्हणजे सरकारची भूमिका
सदावर्ते, लक्ष्मण हाके यांचा विरोध म्हणजे सरकारची भूमिका आहे. ज्या दिवशी जरांगे पाटील आंदोलनासाठी तयार होतात, तेव्हा हाकेंना जाग येते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच लोक सरकारच्या विरोधात होते, आज हेच लोक सरकारच्या बाजूने आहेत. मी खासदार म्हणून नाही तर समाजाचा एक व्यक्ती म्हणून 29 ला आंदोलनात सहभागी होणार आहे, असं परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.