ते जे बोलले ते मी ऐकलं,मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, रोज अनेकांच्या शिव्या ऐकते : चित्रा वाघ
Chitra Wagh Answer to Manoj Jarange मुंबई : भाजप नेत्या आणि विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. चित्रा वाघ यांनी जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे, असं उत्तर मनोज जरांगे यांना दिलं. मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली गबाळं उचकीन म्हणाले जे उचकायचं ते उचका, मी त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे, असं त्या म्हणाल्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही. आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करताय. आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार, असं देखील त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतले तर स्वागत आहे. केवळ पुनरावृत्ती होऊ नये एवढी अपेक्षा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते. ते जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईला कोणी बोललं असतं तरी आम्ही सहन केलं नसतं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
गबाळं नाही तर जे उचकायचं ते उचका
चित्रा वाघ पुढं म्हणाल्या की मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली, गबाळं उचकीन म्हणाले जे उचकायचं ते उचका, मात्र मी काही त्यांना घाबरणारी नाही माझं नाव चित्रा वाघ आहे. गेली 27 वर्ष मी राजकारणात, समाजकारणात काम करते आहे आणि आमदार मी आहे त्यांना माहीत नसेल. मी आमदार असले काय नसले काय जे काम करायला पाहिजे ते मी करत रहाणार, असंही वाघ यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा, कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका एवढेच मला सांगायचं आहे. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलोय हे जरांगे ना कुठे माहिती आहे. घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली गेली, जे करायच ते करा मला फरक पडत नाही माझं नाव चित्रा वाघ आहे, माझं काम मी करत राहणार असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.