शिवनेरी किल्ल्यावरुन तु्म्हाला शब्द देतो…; मुंबईत पोहचण्याआधी जरांगेंनी फडणवीसांना स्पष्टच सा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवर दाखल झालेत. शिवनेरीवर दाखल होताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साथ दिली पाहिजे, असं म्हणाले. तसेच आम्ही मुंबईला जाणारचं, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, असंही मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.

शिवनेरीवरुन मनोज जरांगेंची पत्रकार परिषद, काय काय म्हणाले?

रायगडशिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, अशी टीका मनोज जरांगेंनी सांगितले.

शिवनेरी किल्ल्यावरुन तु्म्हाला शब्द देतो…, मनोज जरांगे म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरुन सांगतो…देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

https://www.youtube.com/watch?v=v9gzr4xlh9s

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं मुंबईत धडकण्याआधी पोलिसांना हमीपत्र; 20 आश्वासने दिली, काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.