तरुणीचा एसटी वाहकावर विनयभंगाचा आरोप; प्रवाश्यांसह बस पोहचली थेट पोलीस ठाण्यात; अन् पुढे…..

भंडारा क्राइम न्यूज: भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथून एक खळबळजानक प्रकार समोर आला आहे? यात रात्रीची शेवटची एसटी बस असल्यानं शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांनी बस खचाखचं भरली होती. त्यानंतरही काही प्रवाशी बसच्या खाली असल्यानं बसमधील प्रवाश्यांना पुढे सरकवण्याचा प्रयत्नात चुकून वाहकाचा स्पर्श एक तरुणीला झाला. मात्र, सदर तरुणीनं एसटी बस वाहकानं तिचा विनयभंग केल्याचा आरोप करीत सर्व प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात नेली. यावेळी तरुणीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांकडे तक्रार केली?

या तक्रारीवरून बसमधील सर्व प्रवाशांची चौकशी केली असता, असा प्रकार झाला नसल्याचं समोर आलं. त्यानंतर तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तरुणीला समज देत एसटी पुढील प्रवासाला निघाली. यात मात्र, बस मधील प्रवाश्यांना तासभर नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. हा संपूर्ण प्रकार काल (8 सप्टेंबर) रात्री भंडाऱ्याच्या साकोली एसटी आगारात घडला. तर साकोली इथून बोडदे गावाला जाणारी ही बस होती.

गणेश विसर्जनादरम्यान झालेल्या शुल्लक वादात मित्रानेच केला मित्राचा खून

गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या शुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात उघडकीस आली आहे. नितीन चुटे असं 35 वर्षीय मृतक तरुणाचं नाव आहे. काल रात्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील झालेल्या नितीनचा त्याचा मित्र अमोल नवघरे यांच्याशी वाद झाला. या वादाचं पर्यावसन चाकू हल्ल्यात झालं. ज्यामध्ये नितिनचा घटनास्थळीच मृत्यू झालावाय? दरम्यान, या प्रकरणी वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पातील कार्यक्रम

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात असलेल्या बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. मुल तालुक्यात असलेल्या या सोमनाथ प्रकल्पात तुळशीराम बिलोने आणि त्यांची पत्नी अन्नपूर्णा बिलोने (52) हे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. पहाटेच्या दरम्यान अंगणात भांडे घासत असताना वाघाने अचानक अन्नपूर्णा बिलोने यांच्यावर हल्ला केला. पत्नीचा आवाज ऐकताच पतीने त्यांना वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र हल्ल्यात गंभीर झालेल्या अन्नपूर्णा बिलोने यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला. वन विभागाने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.