नर्तकी पूजानं आता उघडलं तोंड, गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत दिली कबुली, म्हणाली…
सोलापूर : एखाद्या सिनेमाचीच आठवण करून देणारी धक्कादायक घटना बार्शीत घडली आहे. लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच आणि प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमावणारे गोविंद बर्गे हे एका कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात अडकले. लग्न झालेलं असूनही त्यांनी तिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला. मोबाइल, मोटारसायकल, प्लॉट, सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तूंसोबतच लाखो रुपयेही तिच्यावर खर्च केले. मात्र, प्रेमसंबंध लवकरच कटू झाले. पूजा गायकवाड हिने वारंवार कोणत्या ना कोमथ्या गोष्टींची मागणी करू लागली. त्यानंतर गेवराईतलं घर तिच्या मनात भरलं, ते घर नावावर करा माझा वाढदिवस जवळ आहे, त्यावेळी ते नावावर केले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशा धमक्या ती देऊ लागली, असा आरोप बर्गेंच्या नातेवाइकांनी केला आहे. या सततच्या दबावामुळे मानसिक खचलेले गोविंद बर्गे मंगळवारी पूजाच्या घरासमोर गाडीमध्ये बसले आणि स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली.
बर्गेंच्या कुटुंबीयांनी पूजाविरोधात गंभीर आरोप केले असून वैराग पोलिसांनी तिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र, या प्रकरणात आता अनपेक्षित वळण आले आहे. कुटुंबीयांच्या आरोपांना छेद देत डान्सर पूजाने चौकशीत वेगळीच कबुली दिल्याचे समोर आले आहे. गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाडने पोलिसांना कबुली दिली आहे.
गोविंद बर्गेंनी गोळी झाडली, तेव्हा पूजा कला केंद्रातच होती
गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं समोर आहे. त्यावेळी ती पारगाव येथील कला केंद्रात रात्रभर असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे. पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हा गेवराईवरून तिला शोधत बार्शी तालुक्यातील वैरागजवळ आले. तिथे आल्यावर गोविंद यांनी पूजाला अनेक फोन केले होते. आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल संबंधावरून तपासाची दिशा ठरणार आहे. पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे पोलीस आता सगळ्या बाजूने तपास करत आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात; मोबाईल बंद होता
मात्र माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणी केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मानसिक तणावात होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात होते. त्यांचा मोबाईल बंद होता. अशी माहिती त्यांच्या मित्र परिवारांना दिली. घटनेच्या ठिकाणी गेलो असता तेथे एक बाब निदर्शनास आली. मानसिक तणावाखाली येऊन ही घटना झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता. आणि त्यांचा कुणाशीही संवाद नव्हता. त्यामुळे आमच्या असं लक्षात येत हा घात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने केली.
नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आणखी वाचा
Comments are closed.