देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी?; मुख्यमंत्र्यांनी तो आदेश दिल्याने ‘भाई’

मराठी And Devendra Fadnavis मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात नाराजीची  ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. याआधीच्या अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. तर 19 ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी  अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यानंतर आता नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरूच-

एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेकडून विभागप्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम उपनगरात विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी असतानाच दक्षिण मुंबईतही आता उघड उघड विभागप्रमुखांच्या नियुक्तीला विरोध होऊ लागला आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेच्या विभागप्रमुखपदी माजी नगरसेवक नाना अंबोलेच्या नियुक्तीवरून पदाधिकार्यांमध्ये नाराजी आहे. शिवडी विधानसभा क्षेत्रातील 5 पैकी 4 शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी या नियुक्तीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तर आपल्यानंतर आलेल्यांना संधी दिल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नाना अंबोलाच्या नियुक्तीच्या विरोधा पदाधिकार्यांकडून उघड उघड सह्यांची मोहिम राबवत लवकरच याबाबतचं पत्र मुख्य नेते एकनाथ शिंदेंना दिले जाणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुक शिंदेंसाठी महत्वाची माणली जात असताना, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी एकनाथ शिंदेंना परवडणारी नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले

Naxal: मतचोरी संदर्भातील काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचाही पाठिंबा; सर्वोच्च सेंट्रल कमिटीच्या पत्रकातून मोदींसह भाजपवर गंभीर आरोप

आणखी वाचा

Comments are closed.