सातारा, औंध गॅझेट लागू केल्यास सरकार तोंडघशी पडेल; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; म्हणाले, एका जाती

मराठा आरक्षणावरील लक्ष्मण हाक: “एका जातीला अनेक प्रकारचे आरक्षण देता येत नाही,” अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्य सरकारवर (Maharashtra Government) कडवट टीका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“सरकारने सातारा व औंध गॅझेट लागू केल्यास, ते तोंडघशी पडतील. न्यायालय त्यांना योग्य ती जागा दाखवेल,” असे म्हणत हाके यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “दसरा झाल्यानंतर ओबीसींची संघर्ष यात्रा सुरू होईल आणि त्याचा समारोप मुंबईत होणार आहे. त्यावेळी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत जाऊ,” अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

न्यायालय सरकारला योग्य ती जागा दाखवेल

लक्ष्मण हाके म्हणाले की, सरकारने सातारा आणि औंध गॅझेट लागू केल्यास सरकार तोंडघशी पडेल. न्यायालय सरकारला योग्य ती जागा दाखवेल. कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये घुसण्याचा डाव या सरकारने, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आखलेला आहे. हा डाव त्यांच्या अंगलट येईल. इथून पुढे ओबीसीला मतदान करताना वेगळा विचार करावा लागेल. ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालवले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येणे म्हणजे ओबीसींचा आरक्षण संपले आहे. कुणबी करणाद्वारे ओबीसींचे आरक्षण संपवले जात आहे. मराठ्यांचा मागासलेपणा न्यायालय आणि आयोगाने वेळोवेळी नाकारला आहे, असे त्यांनी म्हटले.

जरांगेंवर एकही गुन्हा दाखल नाही

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की,  जरांगे यांनी बीड शहर पेटवलं. जरांगे यांनी मुंबई वेठीस धरली. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांची आई-माई काढली. त्यावेळी बीड जिल्ह्यातले वातावरण दूषित नव्हतं का? त्यांचा जाच सहन करायचा आणि ओबीसीने काहीच बोलायचं नाही. ओबीसीने बोललं की, वातावरण दूषित होतं म्हणजे हे आमच्या बाबतीत होते. हा सामाजिक दुजाभाव आहे. आम्ही मोर्चा काढल्यामुळे गेवराई आणि बारामतीत आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. जरांगे मात्र लाखो माणसं मुंबईत घेऊन गेले. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.

दसरा झाल्यानंतर ओबीसींची संघर्ष यात्रा

खासदार सोनवणे, आमदार पंडित आणि आमदार सोळंके यांनी ओबीसींच्या आरक्षणाचे काय होईल? याबाबत कधीही बोलले नाहीत. या तिघांनीही राजीनामा देऊन जरांगेना पाठिंबा द्यावा, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले. ओबीसी आंदोलनात फूट पाडायचा उद्देश कधीच सफल होणार नाही. दसरा झाल्यानंतर ओबीसींची संघर्ष यात्रा असणार आहे. त्या संघर्ष यात्रेचा समारोप मुंबईत होईल. त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत, अशी घोषणा देखील लक्ष्मण हाके यांनी केली.

https://www.youtube.com/watch?v=ez5qdsi6z7k

आणखी वाचा

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात

आणखी वाचा

Comments are closed.