शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं

अंडे: महाराष्ट्रात आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलेला असताना बीडमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाथापूर गावातील गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने ओबीसी आरक्षणाच्या विवंचनेतून आत्महत्या किल्ल्याची माहिती समोर येत आहे. सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलींच्या शिक्षणाचे कसे होईल असा प्रश्न त्यांना सतावत होता. यात विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहायला मिळत असताना बीड तालुक्यातील नाथापुर गावात गोरख नारायण देवडकर या 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ओबीसी आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून  या व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात देवडकर यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा विचार करावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.

मुलींच्या शिक्षणाची चिंता, बापाने टोकाचे पाऊल उचलले

आपल्या वडिलांच्या आत्महत्या नंतर त्यांच्या मुलीने सांगितले, ” जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तेव्हापासून माझे वडील सातत्याने चिंतेत होते. कारण त्यांना माझ्या नोकरीची जास्त चिंता होती. त्यांनी मजुरी करून आमच्या नोकऱ्यांसाठी पैसा लावलाय. आधीच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. आता त्यामध्येच मराठा समाज आला आहे. आपल्या मुलींचा कसं होईल? असं ते सतत मला बोलायचे. या चिंतेतून त्यांनी असं टोकाचे पाऊल उचललं. हे सांगताना मुलीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते.  वडील मजुरी करायचे जे मिळेल ते काम करायचे. मुलींची आई ही मजुरी करते. तीन बहिणींचे लग्न झाले आहेत. दोघी बहिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत.

देवडकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे. घटनेनंतर गोरख देवडकर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू आहे. या आत्महत्येची माहिती समजताच नाथापूरसह परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.बीडमध्ये काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाच्या चिंतेतून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे मराठा समाजातील तरुण नितीन माणिकराव चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण जाणार या संभ्रमातून आणि मुलींच्या भविष्याच्या चिंतेतून एका 50 वर्षीय व्यक्तीने जीव संपवल्याचं समोर आलं  आहे.

आणखी वाचा

Comments are closed.