हिंमत असेल तर दुबईत जाऊन पीच उखडून दाखवा; ज्योती वाघमारे कडाडल्या, ठाकरेंना काय काय म्हणाल्या?
संजय राऊतवरील ज्योती वाघमरे: आशिया कपमध्ये (Asia Cup 2025) आज दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होलटेज क्रिकेट सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अलीकडेच बिघडले आहेत. त्यामुळे भारतातून अनेकांनी पाकिस्तानविरुद्धचा भारताचा सामना रद्द करावा, पाकिस्तानविरुद्ध भारताने खेळू नये, अशी मागणी होत आहे. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. संजय राऊतांच्या या टीकेवर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बेशरमपणा, निर्दयपणा काय असतो हे संजय राऊत यांची प्रेस बघा. आज संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये शिव्या दिल्या. कोणत्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणार नाही. एक काळ असा होता, सकाळी उठले की, लोक देवाची नावे घ्यायची. आजची सकाळ भांडुपच्या भामट्याने उजळत आहे… हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत ज्योती वाघमारे यांनी निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं होतं, कुत्ते सिर्फ भोगते है, असली शिवसैनिक ठोकते है…असंच बोलत असतील तर महाराष्ट्राचा शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील ज्योती वाघमारे यांनी दिला.
तुम्ही तिथे जाऊन पीच उखडून दाखवा- ज्योती वाघमारे
उद्धव ठाकरेंना पहलगामवर बोलायचा अधिकार नाही. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा सर्व पक्ष बैठक बोलावली होती. उबाठाचे सगळे खासदार गैरहजर होते. पहलगाम हल्ला झाला, त्यावेळेस त्या ठिकाणी पोहचणारे महाराष्ट्राचे पहिले नेते एकनाथ शिंदे होते. संजय राऊत यांनी आपली बोलबच्चनगिरी बंद करावी. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही राहुल गांधी यांची भाषा बोलताय. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या लोकांसोबत तुम्ही जाऊन बसताय. ऑपरेशन सिंदूरच्या पुड्या तुम्ही बांधताय, अशी टीकाही ज्योती वाघमारे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असताना भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान मैदान उकडण्याचं काम केलं होतं. ते नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे संजय राऊतजी तुम्हाला एवढेच वाटत असेल तर ज्या ठिकाणी मॅच होत आहे, तिथे जाऊन तुम्ही मैदान उखडा…कंगना रणौतला ट्विट करून जा म्हणण्यापेक्षा, तुम्ही तिथे जाऊन पीच (खेळपट्टी) उखडून दाखवा, असं आव्हान देखील ज्योती वाघमारे यांनी दिलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=et1_sljmvck
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.