‘भारत-पाक मॅच नको, ते सुधारणार नाहीत…’ पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या वडिलांसाठी मुलाची

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक 2025 सामना: दुबईमध्ये आशिया कप 2025 मधील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंगणार आहे. आज रात्री 8 वाजता हा महामुकाबला खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याला देशभरात तीव्र विरोध होत असून “क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम” अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणताही सामना खेळू नये अशी मागणी सातत्याने होत आहे.

पहलगाम हल्ल्यात बाप गमावला, डोंबिवलीचा हर्षल म्हणाला, भारत-पाक मॅच नको…

या पार्श्वभूमीवर कै. संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘पाकिस्तानसोबत सामने अजिबात झाले नाही पाहिजेत. माझं मत आहे की आता खेळ होऊ नये. आधी मला वाटायचं की राजकारण वेगळं असावं आणि खेळ वेगळा असावा. पण आता तसं वाटत नाही, कारण हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. पाकिस्तानला सर्व बाजूंनी एकटा पाडलं पाहिजे,” असे त्याने सांगितले.’ भारत-पाक सामन्याबाबत समाजात प्रचंड भावना उफाळून आल्या असून अनेक संघटना, नागरिक आणि हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबीय या सामन्याच्या पूर्ण बहिष्काराची मागणी करत आहेत.

शिवसेना ठाकरे गटांकडून तीव्र विरोध

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला शिवसेना (ठाकरे गट) कडून तीव्र विरोध करण्यात आला. आज (14 सप्टेंबर) राज्यभरात या सामन्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. “माझं कुकूं, माझा देश” या घोषणेसह शिवसेनेच्या महिला आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन झाले.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील आंदोलन करत टीव्ही फोडले. महिला आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. सरकार अजूनही सांगत आहे की ही मोहीम सुरूच आहे, मग पाकिस्तानविरुद्ध सामना का? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आज राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

हे ही वाचा –

पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर एल्गार, महिलांसह शिवसैनिक रस्त्यावर; संजय राऊत म्हणाले, जे क्लब किंवा रेस्टाँरंट पडद्यावर दाखवतील त्या ठिकाणांची माहिती द्या

आणखी वाचा

Comments are closed.