नवीन मुंबईगार्थ ड्रग्स माफिंचम नेट्स उददवास्ट, शांताबाई कर्टुर

नवी मुंबई ड्रग्स प्रकरणः नवी मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी परिसरात ड्रग्ज तस्करीसह दहशत पसरवणाऱ्या शांताबाई करंडेकर आणि तिच्या साथीदारांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात मकोका लावण्याची ही नवी मुंबई पोलिसांची पहिली कारवाई ठरली आहे. ड्रग्जमाफियांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

नवी मुंबईतील ड्रग्जमाफियांचे जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. शांताबाई करंडेकरनं दिघा परिसरातील एका इमारतीत आपल्या साथीदारांसह खुलेआम ड्रग्ज विक्रीचे रॅकेट सुरू केलं होतं. या टोळीवर याआधी मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि अमली पदार्थ विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्यानं गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकानं जुलै महिन्यात कारवाई करून 75 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता शांताबाई करंडेकर आणि तिच्या साथीदारांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

घणसोलीत 72 लाखांचे ड्रग्ज जप्त

घणसोली स्टेशन परिसरात एक इसम, अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीसांना मिळाली होती. त्या ठिकाणावरील संशयास्पद हालचाली असणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची अंग झडती घेतली असता, निखिल राजकुमार वागासे आणि मसूद अब्दुल सलाम खान यांच्याकडून 72 लाखांचे अमली पदार्थ हस्तगत केले. त्याचसोबत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन असा एकूण 85 लाखांचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.