दादरमधील संदीप देशपांडेंचं हॉटेल भाजपच्या रडारवर, म्हणाले, ‘हॉटेलचा आचारी मराठी नाही’, राज ठाकर
इंदुरी चाट संदीप देशपांडे: मराठी भाषा, स्थानिक रोजगार आणि भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यांवर सतत महायुती सरकारवर हल्लाबोल करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) सध्या सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या टीकेचा सामना करत आहेत. याचे कारण म्हणजे देशपांडे यांनी दादरमध्ये सुरु केलेले एक नवे उपहारगृह “इंदुरी चाट आणि बरंच काही…”
संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये सुरु केलेल्या या उपहारगृहात मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जातात. याचा व्हिडिओ खुद्द देशपांडेंनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की, सुप्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी त्यांच्या उपहारगृहाला भेट दिली होती.
सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरु केलेल्या “इंदुरी चाट आणि बरंच काही….”या उपहार गृहाला भेट दिली pic.twitter.com/1ztkjerfoo
– संदीप देशपांडे (@सॅन्डिपदादार्म्स) 19 सप्टेंबर, 2025
भाजपकडून सोशल मीडियावर टीका
याच पार्श्वभूमीवर, भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून देशपांडेंवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या हॉटेलचा कूक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठीपण? यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा!” इतकंच नव्हे तर, राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा फोटो लावत, “हमारे संदीप भय्या के दुकान में आनेका हा” अशा प्रकारच्या पोस्टसह भाजप समर्थकांनी मनसेवर उपरोधिक हल्ला चढवला आहे.
संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
या टीकेला उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, “इंदुरी चाट”वरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे ‘इंदुरी फूड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे”, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.