महाराष्ट्रात बामणांना महत्त्व नाही, पण युपी, बिहारमध्ये ब्राह्मण शक्तिशाली, जातीपेक्षा गुण महत्

ब्राह्मण समुदायावरील नितीन गडकरी: राज्यात सध्या मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामजिक वादळ उठले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ब्राह्मण समाजाला (Brahmin Community) आरक्षण (Reservation) दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो. एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्त्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. (Nagpur Marathi News)

मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात बामणांना फार महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी मिश्रा, या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे, तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nitin Gadkari: राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव असतो: नितीन गडकरी

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सरकारी निर्णयप्रक्रियेतील राजकारण्यांच्या हस्तक्षेपाबाबत भाष्य केले. प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते. परंतु, राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार, आर्टिटेक्ट यांना काम द्या, त्याला देऊ नका, असा सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो. त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम करायला हवे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

https://www.youtube.com/watch?v=fypzsvwpjku

आणखी वाचा

पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम; ‘इथेनॉल’वरून नितीन गडकरींचा गंभीर आरोप

मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवा, जिथं जातात तिथं आग लावतात; धर्माच्या नावाखाली राजकारण समाजासाठी हानिकारक; नितीन गडकरींकडून पुन्हा खडे बोल

आणखी वाचा

Comments are closed.