50 लाख मराठा ओबीसीमध्ये येतील, आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील : वडेट्टीवार

विजय वाडेटीवार: कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी हा ओबीसींच्या (OBC)  भरवश्यायावर निवडून येतो. तुमच्याच भरवश्यायावर मस्ती करतो असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  यांनी व्यक्त केले. ओबीसींना बांधवांनी त्यांना वठणीवर आणाण्याचं केलं पाहिजे असेही ते म्हणाले. वेळ आल्यास आल्यास बदडून काढायला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नवीन जीआरमुळे 50 लाख मराठा हे ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील. ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे, त्यात एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये याची सुरुवात गोंदियापासून केली

आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये याची सुरुवात आपण गोंदियापासून केली आहे असे वडेट्टीवार म्हणाले. 2 सप्टेंबर च्या जीआरमध्ये पात्र शब्द हटवल्यामुळे सरसकट हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये येतो. शिंदे समिती सरकारने नेमली आहे. शिंदे समिती निकाल मराठ्यांच्या बाजूने देणार की ओबीसींच्या बाजूने देणार हे पाहावं लागेल असे वडेट्टीवार म्हणाले. दोन सप्टेंबरच्या जीआरच्या त्रुटीचे वड्डेटीवार यांनी वाचन केले.

नांदेडमध्ये मोठ्या नेत्याने फोन करून लगेच जातीचा दाखला दिला

नांदेडमध्ये मोठ्या नेत्याने फोन करून लगेच जातीचा दाखला दिला याचा पुरावा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या या जीआर मुळे 50 लाख मराठा हे कुणबी प्रमाण ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील.ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे आणि एवढे लोक आले तर आमच्या  तोंडातला घास हिरावून नेतील असे वडेट्टीवार म्हणाले.

दहा लाख ओबीसींचा मोर्चा मुंबईला धडकणार

ओबीसीच्या एल्गार गोंदियातून सुरू झाला आणि यापुढे सरकारला झुकावच लागेल असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला. दहा लाख ओबीसींचा मोर्चा मुंबईला धडकणार आहे. करो किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण करुन ओबीसी बांधवांना लढावाच लागेल असेही वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरेंगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Beed News : ओबीसी नेत्यांना लक्ष्मण हाकेंचे वावडे? बीड येथील महाएल्गार सभेमधून वगळल्याने अनेक चर्चेला उधाण

आणखी वाचा

Comments are closed.