वडेट्टीवार अन् महापौर बाईंनी जास्त चाभरेपणा करू नये; संजय गायकवाडांचा यु-टर्न
संजय गायकवाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर कधी कधी 100 बोकड सुद्धा द्यावे लागतात असं वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी काल एका सभे दरम्यान केलं होतं. यावर विरोधकांनी टीका केली. मात्र, या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आमदार संजय गायकवाड यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना स्पष्ट सुनावलं आहे. ते वडेट्टीवार, वैभव नाईक व त्या मुंबईच्या महापौर बाईंनी जास्त चभरेपणा करु नये. मी माझ्या पक्षाबद्दल नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो असे गायकवाड म्हणाले.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांनी 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही संजय गायकवाडांचा आरोप
बुलढाणा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना शरद पवारांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांनी असा खर्च केल्याचाही त्यांनी सांगितलं. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांनी 70 कोटी रुपये खर्च केल्याचाही आरोप संजय गायकवाड यांनी नाव न घेता केला.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकत्र लढणार की स्वबळावर निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचं वक्तव्य केलंय. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन-तीन कोटीपर्यंत खर्च होतो, असे म्हणत त्यांनी निवडणुकीचा खर्चच सांगितला आहे. बुलढाणा येथे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे. ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो. लोकसभेला युती करतो आणि ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Gaikwad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तीन-तीन कोटी खर्च होतो, 100 बोकडं दिली जातात; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
आणखी वाचा
Comments are closed.