राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे; पुणे विमानतळ

गुन्हे ठेवा: पुणे विमानतळावर (Pune Airport) शुक्रवारी रात्री मोठी खळबळ उडाली. माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल (Chandrakant Prabhakar Bagal) यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे आढळून आले. पुणे (Pune) ते वाराणसी (Varanasi) या प्रवासादरम्यान विमानतळावरील सुरक्षा चौकशीदरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅग स्कॅनदरम्यान आढळले शस्त्र

चंद्रकांत बागल (63, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) हे शुक्रवारी रात्री वाराणसीला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आले होते. चेक-इन प्रक्रियेपूर्वी त्यांच्या बॅगेची तपासणी सीआयएसएफ (CISF) व विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्कॅनरमधून केली असता, बॅगेत रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी संबंधित शस्त्र जप्त केले.

परवाना केवळ महाराष्ट्रापुरता वैध

बागल यांनी संबंधित शस्त्रासाठी शस्त्र परवाना घेतलेला असला तरी, तो परवाना फक्त महाराष्ट्र राज्यापुरता वैध असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे ते हे शस्त्र घेऊन विमानातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर, बागल यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर बागल यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.

राजकीय पार्श्वभूमी

चंद्रकांत बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यापूर्वी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते.

Pune Crime : पुण्यातील एमआयटी कॉलेज परिसरात आढळला मृतदेह

दरम्यान, शुक्रवारी पुण्यातील एका महाविद्यालय परिसरात वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. सुभाष कामठे असे 65 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुभाष कामठे मूळचे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. तसेच, कामठे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Jalgaon Crime : बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी, केबिनमध्ये बोलावलं अन्…; जळगावात खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.