आपल्यात जे झाले ते विसरून जा, तुला जे करायचे ते कर; लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाकडून महिलेवर अत्य
Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातून (Ahilyanagar Police) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (Pratap Darade) यांच्याविरोधात एका 30 वर्षीय तरुणीने बलात्कार, दमदाटी, आणि जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भात गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी तो मनोर पोलीस स्टेशन, पालघर (जि. ठाणे) येथे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारीतील गंभीर आरोप
तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत, आरोपी प्रताप पांडुरंग दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध पालघर येथील फार्महाऊस, तसेच जोगेश्वरी वेस्ट, मुंबई येथे ठेवण्यात आले, असा आरोप आहे.
पीडितेने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला, तेव्हा आरोपीने तिला “जे काही आपल्यात घडलं, ते विसरून जा” असे म्हणून शिवीगाळ केली आणि पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करताच “तुला जे करायचं ते कर” अशी दमदाटी दिली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली गेली असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
पोलीस दलात खळबळ
या प्रकरणामुळे संपूर्ण अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर इतका गंभीर आरोप झाल्यामुळे पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरणाचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यातून मनोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
Ahilyanagar Crime : प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी मागितले 1 कोटी, गुन्हा दाखल
दरम्यान, प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच अडवून हा वाद मिटवायचा असेल तर 1 कोटी रूपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पती-पत्नी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश लोंढे व उषारजनी लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश हरिभाऊ गोंडाळ (47) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे बंधू महेश गोंडाळ हे 12 सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या मिळकतीच्या ठिकाणी असताना प्रकाश लोंढे हे आले व त्यांनी सदर प्लॉट वरील ताबा सोडण्यासाठी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या नावाने शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी हे तोफखाना पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेथून ते बाहेर पडत असताना पोलीस ठाण्याच्या आवारात प्रकाश लोंढे व त्यांची पत्नी उषारजनी लोंढे उभे होते. ते फिर्यादीला म्हणाले कशाला वाद वाढवतो, मी वकील आहे. शेवटपर्यंत तुम्हाला सुधरू देणार नाही, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवेल. या पेक्षा वाद मिटवून टाका मला 1 कोटी रूपये द्या मी प्लॉट वरील दावा सोडतो असे म्हणत खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.