एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर या रणांगणात; सांगलीतून निलेश लंकेंचं आव्हान, रोहित पवारही बसर
गोपीचंद पडलकरवरील निलेश लँके आणि रोहित पवार: भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि त्यांच्या वडिलांविषयी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेवरून निर्माण झालेल्या वादळाचे पडसाद आज सांगलीत तीव्रतेने उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित ‘संस्कृती बचाव मोर्चा’ च्या सभेत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
दम आहे तर या रणांगणात : निलेश लंके
खासदार निलेश लंके म्हणाले की, याचा आका एसीत बसतो, आकालाच धडा शिकवायला हवा. एकदा पोलीस बाजूला ठेवा, दम आहे तर एकदा रणांगणात या. सरकारमधील लोकांकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून असल्या गोष्टी पुढे केल्या जातात. वाचाळवीर आधी दोन पोलीस घेऊन फिरत होते, आता चार पोलीस घेऊन फिरत आहेत. दम असेल तर पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने : रोहित पवार
आमदार रोहित पवार म्हणाले की, गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने आहे. हा विषय तालुका, जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो, पण आम्ही शब्दांची पातळी जपतो. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात, या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिराती दिल्या, निनावी जाहिराती दिल्या. गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात फडणवीस यांनी आणले आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला.
यांचा बोलवता धनी कोण? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील महामानवांनी आम्हाला विचार दिला, आपण महामानवांची जयंती साजरी करतो पण त्यांच्या विचारांचे अनुकरण करत नाही. बहुजन समाजाच्या नेत्याचा वापर पवार कुटूंबावर, मोठ्या नेत्यावर बोलण्यासाठी केला जातोय. पवार कुटुंबाला बोलतात, पाटील कुटुंबाला बोलतात, बहुजन समाजाच्या नेत्यांना कळत नाही की यांचा उपयोग करून घेतला जात आहे. या लोकांना बोलून उपयोग नाही, यांचा बोलवता धनी कोण? त्यांना बोलले पाहिजे. आमच्यावर ईडीची नाहीतर दुसरी कोणतीही कारवाई करा, आम्ही घाबरणार नाही. निवडणूक आली की हे लोक समाजासमाजात तेढ निर्माण करतात. लोकसभेत हिंदू-मुस्लिम केले, विधानसभेत मराठा ओबीसी केले. आता मुंबईत मराठी-अमराठी करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
जयंत पाटील गप्प बसले पण मी गप्प बसणाऱ्यातील नाही; जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांना इशारा
आणखी वाचा
Comments are closed.