‘माझं कर्तव्य होतं ते मी केलं, त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…’,पडळकरांच्या जयंत पाट


गोपीचंद पडलकरवरील शरद पवार: राज्याच्या राजकीय वर्तुळात काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरून राजकीय वातावरण तापलं होतं, पडळकरांच्या टीकेच्या संदर्भात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी अशी गलीच्छ टीका करणं योग्य नाही, असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं. तसेच गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे, असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितलं होतं, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना फोन करून अशा टीका करणं किंवा वक्तव्य करणं टाळावं असं म्हटलं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अपेक्षा करूया चांगलं वातावरण होईल असं म्हटलं आहे.

Sharad Pawar on padalkar controversy: मी त्यावरती  समाधानी नाही

आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं, पण फार गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलं नाही, अशी शंका येईल, असं त्यांचं उत्तर होतं, अपेक्षा करूया, राज्यात चांगलं वातावरण होईल, मी त्यावरती समाधानी नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Heavy Rain: सोयाबीनसह इतर पीकं कुजून गेली

जिथं पाऊस पाण्याची कमतरता असते, तिकडे अतिवृष्टी झाली. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झाला आहे. आपण बघितलं, या महिन्यात सोयाबीनंचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं, काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पीकं घेतली जातात. सोयाबीनचे पीके हे भरवश्याचं पीक असते. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाकीच्या पिकांची वाढ झाली, पण पाच दिवस वाफ्यात पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पीकं कुजून गेली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्यापासून उत्पादन होतं, ते हातात पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही. ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असतो, तिकडे झाली आहे.

Heavy Rain: नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साहाय्य करण्याची योजना

सोलापूर, लातूर, धाराशिवजालना, परभणीदक्षिण नगर हे भाग आहेत, या सगळ्याठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साहाय्य करण्याची योजना आहे. राज्यामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्र सरकारकडून अशा परिस्थितीत मदत करायला जी योजना आहे, त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने  पंचनामे करुन घेणे आणि तातडीने त्यांना नुकसान भरपाई देणे, या दोन गोष्टी करण्याची गरज आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar: आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल

पुढे शरद पवार म्हणाले, ही नुकसान भरपाई कशाची असते, एक पीक, दोन गुरेढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक वाया गेलं तर फक्त त्यावर्षी नुकसान होते. पण जमिनीवरची माती वाहून गेली तर त्यामधून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करुन, पीक गेलं म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यासाठीही मदत करावी लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, गुरं वाहून गेली. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पहिल्यांदा पंचनामे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरुपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल.

Sharad Pawar: पाहणी झाल्यावर तातडीची मदत करणे गरजेचे

काही लोक फिल्डवर जाऊन पाहणी करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांची पाहणी झाल्यावर तातडीची मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला पुन्हा एकदा कसा उभा करायचा, या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावे.  हवामान खात्याने पुढील चार दिवस पाऊस आहे. यावेळचं वैशिष्ट असे आहे की, हवामान खाते जे जे सांगतंय , ते ते घडतंय अगदी सुरुवातीपासून. मे महिन्याच्या कालखंडातही पाऊस पडला. सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. तेव्हापासून आतापर्यंत हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावध केले आहे. त्यांची अंदाजाची माहिती आहे, त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे.

https://www.youtube.com/watch?v=US9-mg7gkao

आणखी वाचा

Comments are closed.