जगप्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन, टीम इंडियाच्या 1983 विश्वचषक विजयाचा साक्षीदार हरपला


मुंबई : क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध अंपायरांपैकी एक अशी ओळख असलेल्या डिकी बर्ड (डिकी बर्ड) यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. इंग्लंडच्या यॉर्कशर (यॉर्कशायर) क्लबने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. डिकी बर्ड यांनी तब्बल 150 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यांच्या निधनावर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) शोक व्यक्त केला.

सलग तीन वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यांमध्ये (विश्वचषक फायनल्स) अंपायरिंग करणारे डिकी बर्ड हे पहिले अंपायर होते. 1975, 1979 आणि 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी अंपायर म्हणून काम केलं. 1983 च्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (भारत वि वेस्ट इंडीज 1983) पराभव करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता, त्याचे साक्षीदारही डिकी बर्ड ठरले होते.

डिकी बर्ड क्रिकेट कारकीर्द: क्रिकेट कारकीर्द अपयशी, पण अंपायरिंगमध्ये यश

डिकी बर्ड यांचा जन्म 19 एप्रिल 1933 रोजी इंग्लंडच्या बार्न्सले येथे झाला. सुरुवातीला ते फर्स्ट क्लास क्रिकेटर होते, पण क्रिकेटपटू म्हणून त्यांना मोठे यश मिळाले नाही. यॉर्कशर आणि लेस्टरशरकडून खेळूनही फक्त 3,314 धावा करण्यापर्यंत त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली. परिणामी, त्यांनी 32 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केले.

डिकी बर्ड पंच करिअर: अंपायरिंगमुळे बदलले आयुष्य

क्रिकेट सोडल्यानंतर बर्ड यांनी आपला मोर्चा अंपायरिंगकडे वळवला आणि 1970 मध्ये काउंटी चॅम्पियनशिपमधून त्यांनी या नव्या प्रवासाची सुरुवात केली. 1973 मध्ये इंग्लंडन्यूझीलंड टेस्टमधून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढील दोन दशकांत ते जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आदरणीय अंपायर ठरले.

डिकी बर्ड शेवटचा सामना: भारताविरुद्ध शेवटचा सामना

सन 1996 मध्ये भारतइंग्लंड टेस्ट सामन्यात डिकी बर्ड यांनी शेवटची अंपायरिंग केली. हा सामना विशेष ठरला कारण याच सामन्यात सौरव गांगुली (सौरव गंगुली) आणि राहुल द्रविड (राहुल द्रविड) यांनी भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. सामन्यानंतर दोन्ही संघांनी डिकी बर्ड यांना गार्ड ऑफ ऑनर दिला होता.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लॉर्ड्स फायनल 1983: डिकी बर्ड यांनी हात वर केला अन् भारताचा जल्लोष

डिकी बर्ड यांचे नाव विशेषतः वर्ल्ड कपशी जोडलेले आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग याला भारताच्या मोहिंदर अमरनाथ यांनी एलबीडब्लू केले. डिकी बर्ड यांनी हात वर करत आऊटचा निर्देश दिला आणि भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला आणि त्याचे साक्षीदार म्हणून डिकी बर्ड यांचे नाव कायम इतिहासात कोरले गेले.

प्रसिद्ध क्रिकेट पंच: क्रिकेटप्रेमींमध्ये कायम लोकप्रिय

डिकी बर्ड यांनी एकूण 66 कसोटी सामने आणि 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. त्यांच्या अचूक निर्णयक्षमतेसोबतच त्यांच्या साधेपणामुळेही ते क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून राहिले. अंपायरिंगला नवी ओळख मिळवून देणारे आणि ती लोकप्रिय करणारे म्हणून डिकी बर्ड यांचे योगदान अमूल्य मानले जाते.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.