पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व


नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला, त्यानंतर नाशिकच्या तरुणाशी (Nashik Crime News) लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. समलिंगी विवाहानंतर तरुणाची फसवणूक करणाऱ्या तरुणीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरुणाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या (Nashik Crime News) करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. तरुणाने पत्नीचा मोबाइल तपासला असता अश्लील व्हिडिओ आणि फोटोने त्याला मोठा धक्का बसला आहे. तरुणीच्या वडिलांना फसवणूक का केली अशी विचारणा केली असता त्यांनी तरुणालाच धमकी देत शिवीगाळ केली. नाशिक पोलीसंकडून घटनेचा तपास सुरू, प्रकरणातील पती पत्नी उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Crime News)

Nashik Crime News: तिच्या वागण्यात तरुणाला विचित्रपणा जाणवू लागला

मिळालेल्या माहितीनुसार, मैत्रिणीशी केलेला समलैंगिक विवाह लपवून या तरूणीने नाशिकच्या तरुणाशी विवाह करून त्याची फसवणूक केली. या प्रकरणात तरुणीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड (Nashik Crime News) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सामनगाव रोड, सिन्नर फाटा येथील रहिवासी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा विवाह एका तरुणीसोबत झाला होता. मात्र, तिच्या वागण्यात तरुणाला विचित्रपणा जाणवू लागला होता. तिला अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी तिने फिर्यादी तरुणाला दिली होती, असे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. (Nashik Crime News)

Nashik Crime News: तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण हरवल्याची माहिती

लग्नानंतर संबंधित तरुणी सतत फोनवर बोलत असे, तसेच व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करत असल्याचे समोर आले आहे. ‘एमकॉम’च्या परीक्षेसाठी ती माहेरी गेली असता, लग्नावेळी मिळालेलं तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण हरवल्याची माहिती तिने पतीला दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. माहेरून परतल्यानंतर तरुणाने तिचा मोबाईल तपासला असता, तिच्या समलैंगिक विवाहाबाबतची माहिती मिळाल्याने तो थक्क झाला. या संदर्भात तरुणाने तिच्या वडिलांना प्रश्न विचारले असता, त्यांनी उलट तरुणालाच शिवीगाळ करून धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार मोरे पुढील तपास करत आहेत.

Nashik Crime News:  मैत्रिणीसोबत केलेले अश्लील चॅट अन्…

पत्नीने पुणे येथे तिची मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक बाब तरुणाला तरुणीचा मोबाइल तपासल्यावर समजली, यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले अश्लील चॅट, बाथरुममध्ये एकमेकींना विवस्त्र अवस्थेत केलेले व्हिडीओ कॉल, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ, त्यात तरुणीने पती तरुणाचा कसा गेम करते बघ, ही सर्व माहिती त्याला तिचा फोन चेक केल्यानंतर समजली.

पत्नीच्या आईनेदेखील सुरुवातीला या प्रकाराबाबत नकार दिला. परंतु, खुद्द तरुणीनेच मैत्रिणीसोबत आपण समलैंगिक विवाह केल्याचे आणि पुरुषांबाबत आपल्याला आकर्षण नसल्याचे आणि याबाबत आई-वडिलांना सांगितले होती अशी माहिती दिली. मात्र, त्यांनी आपलं लग्न बळजबरीने फिर्यादी तरुणाशी लावून दिले. तसेच हा विवाह होऊ नये म्हणून आपण घर सोडल्याचे, विषारी गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याने तिच्या आईचेही बिंग फुटले. तिला सिगारेट, हुक्क्याचे व्यसन असल्याचेही यातून उघड झाले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.