मनसेतून बडतर्फ झालेले वैभव खेडेकर भाजपकडून पुन्हा वेटिंगवर? पक्ष प्रवेशाकडे भाजप नेत्यांनी फिरव
रत्नागिरी: मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना भाजपकडून पुन्हा वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे, कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना काही दिवसांपूर्वी पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, गणेशोत्सव काळात भाजपचे मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते. शेकडो समर्थकांसह वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) हे पक्षप्रवेशाची तयारी करत असतानाच मात्र मराठा आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली होती. त्यानंतर काल (मंगळवारी) तर वैभव खेडेकर जाहिरातबाजी बॅनरबाजी करत कोकणातून थेट मुंबईत भाजप प्रदेशकार्यालयात पक्ष प्रवेशसाठी दाखल ही झाले होते. गाड्यांच्या ताफ्यासह खेडेकर आले पण भाजप प्रवेशाची गाडी तिसऱ्यांदा अडली, या गाडीला भाजप हिरवा कंदील कधी दाखविणार? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. (Vaibhav Khedekar)
वैभव खेडेकर व्हॉट्सअॅप स्थिती: कोणत्या स्थितीत साध्या जॉर्डर फॉलोरल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आले नेते वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश एकदा लांबणीवर पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या पक्षप्रवेशाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खेडेकर यांचा भाजपातील पक्षप्रवेश चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान मुंबईत पक्षप्रवेशाला गेल्यानंतरही मात्र पक्ष प्रवेश न मिळालेल्या वैभव खेडेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस सध्या जोरदार चर्चेत आले आहे. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मे समुंदर हू लौटकर जरूर आउंगा, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिल्याची चर्चा आहे.
Vaibhav Khedekar: भाजप नेत्यांशी वाढलेल्या जवळकीमुळे मनसे पक्षाचा रोष
वैभव खेडेकर यांचे भाजप नेत्यांशी वाढलेल्या जवळकीमुळे त्यांना मनसे पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वैभव खेडेकर यापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. त्याचा भाजप पक्ष प्रवेश चार सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता. आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याने हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर नियोजित वेळेनुसार काल (मंगळवारी २३ सप्टेंबर) पुन्हा वैभव खेडेकर यांचा भाजपमधील पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता. मात्र तोही आता लांबणीवर पडल्याने कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.या पक्ष प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ४० ते ५० गाड्यांचा ताफा मुंबईतील भाजप कार्यालयात दाखल झाला होता.
वैभव खेडेकर कोण आहे: वैभव खेडेकर कोन?
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जात होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष कमी झाला. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी होती.
आणखी वाचा
Comments are closed.