मारहाण, तोंडावर लघुशंका करतानाचा व्हिडीओ बनवला, लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या व्यक्तीचा दुसरा संतो
माजलगाव : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कंवर (Pawan Kanwar) व त्यांच्या तीन साथीदारांवर तालुक्यातील सावरगावजवळ जेवणासाठी थांबले असतानाच प्राणघातक हल्ला झाला होता. यात पवन कंवर हे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले होते, या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे.
Pawan Kanwar: विजयसिंह पंडितांच्या फोटोवरून हा वाद सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या या कार्यकर्त्याला माजलगावमधील एका हॉटेलमध्ये मारहाण करून त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये लावलेल्या राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडितांच्या फोटोवरून हा वाद सुरू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी हॉटेलमालकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी लक्ष्मण हाके यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेत आरोपीच्या अटकेची मागणी केली.
Pawan Kanwar: आमदार साहेबांना मारणारा हाच होता…
पवन पांडुरंग कंवर (वय २९, रा. केरवाडी, जि. परभणी) हे मंगळवारी रात्री आपल्या मित्रांसोबत माजलगावकडील गढी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. हॉटेलमध्ये विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहून त्यांनी जेवणाची ऑर्डर रद्द केली. यामुळे संतापलेल्या हॉटेलमालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी ‘मराठ्यांना शिव्या देतो का?’ असं म्हणून पवन यांच्यावर लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात पवनच्या डोक्याला, हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली. मारहाणीदरम्यान, हल्लेखोरांनी ‘आमदार साहेबांना मारणारा हाच होता, गाडीवर नाचणारा हाच होता’ असे म्हणत पवनला मारहाण केली.
laxman hake on Pawan Kanwar: दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न : लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके यांनी माजलगाव येथील हल्ल्यासंदर्भात काल (बुधवारी, ता 24) पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे, अन्यथा पोलिस ठाण्यात मोर्चा काढू असा इशारा हाकेंनी काल दिला आहे. “हा हल्ला म्हणजे दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न होता,” असे हाके म्हणालेत. हल्ल्यातील आरोपी प्रवीण जगताप आणि नितीन जगताप हे वाळू माफिया असून, आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही हाकेंनी केला आहे.
laxman hake on Pawan Kanwar: प्राध्यापक हाके यांच्याकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
ओबीसी कार्यकर्ता पवन कंवर याच्यावर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत आरोपींचे फोटो देखील आहेत. तसेच याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती, यामध्ये त्याने विजयसिंह पंडित यांना उद्देशून मला काम देऊ नका परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या, असे म्हटले होते. त्याच कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये पवन करवर हे जेवण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी 20 ते 25 जणांनी मिळून हल्ला केला. यामध्ये कंवर यांचा एक हात व एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यात देखील रोडचा घाव घालण्यात आल्याची माहिती प्राध्यापक हाके यांनी दिली असून आता पोलिस अधीक्षकांची भेट घेत या आरोपींना अटकेची मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्याचे देखील माहिती प्राध्यापक हाके यांनी दिली.
आणखी वाचा
Comments are closed.