मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून दोन्ही समाज बांधव आरक्षणाच्या लढाईसाठी आंदोलनाचं मैदान गाजवत आहेत. एकीकडे मराठा समाजाला (Maratha) ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत, तर ओबीसी (ओबीसी) आरक्षणात मराठ्यांचा सहभाग नसावा म्हणून लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते पुढे सरसावले आहेत. त्यामध्ये, लक्ष्मण हाके हे आक्रमकपणे भूमिका मांडत असून थेट पवार कुटुंबावर शाब्दिक हल्ला करत आहेत. तसेच, मनोज जरेंग पाटील यांच्यावरही ते जोरकसपणे टीका करत असल्याचे दिसते. त्यातून, त्यांना फोनद्वारे धमक्याही दिल्या जात आहेत. तर, दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडूनकडूनही त्यांना डावललं जात असल्याची चर्चा आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाकेंनी केलेली फेसबुक पोस्टही चांगलीच चर्चेत आहे. त्यावरुन, लक्ष्मण हाके (Laxman hake) आंदोलन पुढे नेणार की सोडणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली. उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात. मला पाठिंबा देत राहिलातमी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही. उद्या Daityandura ता.पाथर्डी जि. अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, असे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो, असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, यासंदर्भात आपण उद्या भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, त्यांची भूमिका त्यांना मिळणाऱ्या धमक्यामुळे आहे की, ओबीसी नेत्यांकडून डालवण्यात येत असल्याने, हेही उद्याच कळेल.
पाकंजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर Sala (पंकजा मुंडे दुसेरा मेलावा)
वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर आता समोर आला आहे. संत भगवान बाबाची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी असणार आहे. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मुंडे समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात. याच मेळाव्याच्या टिझर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक वर पोस्ट केला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.